Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवी मुंबई पोलिसांची सायबर चोरट्या विरोधात धडक मोहीम.

 नवी मुंबई पोलिसांची सायबर चोरट्या विरोधात धडक मोहीम.

नवी मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये करण्यात आली जनजागृती.

प्रसिद्ध सिने अभिनेत्री पूजा हेगडे यांची विशेष उपस्थिती.

 नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी मिलिंद भारंबे यांनी स्वीकारल्यापासून नवी मुंबई शहरात अनेक बदल होताना पहायला मिळत आहेत. सध्या सर्वाधिक गुन्हे हे सायबर क्षेत्रा संबंधित समोर येत आहेत. या सायबर गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी नवी मुंबई पोलीस आता सतर्क झाले असून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई पोलिसां तर्फे जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. सायबर गुणांसंबंधी जनजागृती व्हावी यासाठी नवी मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायबर वॉरियर या उपक्रमांतर्गत सायबर अवेअरनेस समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व्हिडिओ क्लिप्स आणि नृत्यांच्या माध्यमातून सायबर गुन्हे कशाप्रकारे होतात या संबंधित जनजागृती करण्यात आली. हेच विद्यार्थी पुढे जाऊन सायबर वॉरियरच्या भूमिकेत आपल्या परिसरातील व आपल्या शेजारील नागरिकांची जनजागृती करतील असा विश्वास यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला सिद्ध से अभिनेत्री पूजा हेगडे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवत नवी मुंबई पोलिसांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments