Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सोयाबीनच्या सुडीला आग लागून ९० हजार रुपयांचे नुकसान.

 सोयाबीनच्या सुडीला आग लागून ९० हजार रुपयांचे नुकसान.

रिसोड : अज्ञात व्यक्तीने सोयाबीनच्या सुडीला आग लावून 90 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना 11 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजता रिसोड तालुक्यातील सवड शेत शिवाराय घडली.माधव नारायण शेळके यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सवड शिवारात त्यांची दोन एकर जमीन आहे.10 ऑक्टोबर रोजी त्यांनी सोयाबीनची कापणी करून सुडी लाउन ठेवली होती.काल रात्री 9.30 वाजता त्यांच्या सोयाबीनच्या सुडीला आग लागल्याची माहिती कोणीतरी दिली.  टँकरमधून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग इतकी भीषण होती की, सोयाबीन जळून राख झाली सोयाबीनच्या या सुडीत 20 क्विंटल सोयाबीन होते.  ज्याची किंमत अंदाजे ९० हजार रुपये आहे.  पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments