Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

संजय घोडावत स्कूलच्या बालचमूनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली गांधी जयंती.

 संजय घोडावत स्कूलच्या बालचमूनी स्वच्छतेचा संदेश देत साजरी केली गांधी जयंती.

--------------------------------------------
जयसिंगपूर/प्रतिनिधी

---------------------------------------------

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपला परिसर, शाळा, मंदिरे आणि सार्वजनिक सुविधांची सर्व ठिकाणे स्वच्छ करण्याचे आवाहन केले आहे. त्याचाच भाग म्हणून संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या केजी विभागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात महात्मा गांधी जयंती साजरी केली. यावेळी केजी भागातील सर्व विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील बागबगीच्या स्वच्छ केला.

 या कार्यक्रमात बोलताना संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, विद्यार्थ्यांना बालवयात चांगल्या स्वच्छतेच्या सवयी लागणे गरजेचे आहे, आपल्या देशाविषयी प्रेम त्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. महात्मा गांधीजी च्या काही गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या. 

 यावेळी मुख्याध्यापिका लॉरेन डिमेलो यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुलांना संबोधित केले.

 निवंश तनेजा हा विद्यार्थी गांधीजींची वेषभूषा केला होता. 

 अरमान जमादार, श्लोक कुलकर्णी आणि सौम्या माळी या तीन विद्यार्थ्यांनी गांधीजी आणि त्यांचे जीवन आणि तत्त्वे यावर भाषण केले.

सर्व विद्यार्थ्यांनी 'रघुपती राघव राजाराम' हे गांधीजींचे आवडते भजन गायले.

शाळेच्या  परिसरातील बागबगीचेची स्वच्छता करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments