Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

न्यायालयाच्या परिसरात स्वच्छता हि सेवा उपक्रम साजरा.

 न्यायालयाच्या परिसरात स्वच्छता हि सेवा उपक्रम साजरा. 

-----------------------------

 वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

-----------------------------

 न्यायालय परिसरात 100 एनसीसी कॅडेट्सनी कॅप्टन डॉ.समीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली "स्वच्छता ही सेवा" उपक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने पार पडला.

या उपक्रमाचे उदघाटन अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा.श्री.नंदिमठ आणि किसन वीर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफेसर डॉ. सुनील सावंत यांच्या उपस्थितीत पार पडले. त्यानंतर न्यायाधीश मा.तारू, न्यायाधीश मा.पाटो , वाई वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मा. रमेश यादव, उपाध्यक्ष मा.महेश शिंदे, ॲडव्होकेट खडसरे, ॲडव्होकेट गायकवाड, अधिक्षक किरण पोरे व पवार तसेच वाई न्यायालय येथील सर्वच स्टाफ यांनी संपूर्ण न्यायालय इमारत आणि परिसरात स्वच्छता केली.

या उपक्रमात 22 महाराष्ट्र एनसीसी बटालियन, साताराचे हवालदार विश्वास सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.वाई नगरपालिकेने पाण्यासाठी अग्नीशामक बंब पुरविला. रोटरी क्लब, वाई व वाई वकील संघटनेने सर्व 100 छात्रांना मास्क, हातमोजे आणि अल्पोपहार  पुरविला.

Post a Comment

0 Comments