Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

युवक, ग्रामपंचायत सदस्यांकडून बालिंगे स्मशान भूमीची स्वच्छ्ता.

 युवक, ग्रामपंचायत सदस्यांकडून बालिंगे स्मशान भूमीची स्वच्छ्ता.

बालिंगे (ता.करवीर) येथील ग्रामपंचायत सदस्य,गावातील युवक, ज्येष्ठ नागरिकांनी घटस्थापनेच्या एक दिवस आधी आपणही समजाचे काही तरी देणे लागतो या उदात्त भावनेतून स्वच्छ्ता हीच सेवा व संत गाडगेबाबा यांचा कानमंत्र घेऊन बालिंगे ग्रा.प.सदस्य व सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रेरणेतून स्मशान भूमीत स्वच्छ्ता मोहीम राबवली. 

यावेळी ग्रा.प.सदस्य धनंजय ढेंगे,सामाजिक कार्यकर्ते  प्रकाश जांभळे,अजित कांबळे युवासेना करवीर तालुका अध्यक्ष अजय वाडकर, छत्रपती शाहू दूध  संस्थेचे चेअरमन युवराज वाडकर, शतकवीर रक्तदाता आनंदा जाधव, संभाजी पाटील,नामदेव मगदूम,भाऊ घोडके,विजय ढेंगे,अंकुश माने,मुकुंद बुडके ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश पोवार ,अशोक राजेशिर्के आदींनी स्मशान भूमी स्वच्छते मध्ये भाग घेतला.

Post a Comment

0 Comments