Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

श्री. बाळुमामा तरुण मंडळ सुरुपली यांची गणेश मुर्ती आनंदमय वातावरणात संप्पन्न झाली

 श्री. बाळुमामा तरुण मंडळ सुरुपली यांची गणेश मुर्ती आनंदमय वातावरणात संप्पन्न झाली.

--------------------------------------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
सुयोग कुंभार

--------------------------------------------------------------

श्री. बाळूमामा तरुण मंडळ सुरूपली यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी ही गणेश उत्सव थाटामाटात संपन्न झाला दि.19.09.2023 रोजी श्री ची मूर्ती वाजत गाजत आणून प्रतिष्ठापणना करण्यात आली. यावर्षी श्री ची मूर्ती मा. सागर बंडू पाटील यांनी दिली. या गणेश उत्सवाच्या काळात मंडळाकडून दररोज आरती व दि. 25.09.2023 रोजी चुलबंद महाप्रसादाचे आयोजन केले तसेच महिलांना प्रोत्साहन देत महिलांसाठी फनी गेम्स व संगीत खुर्ची यांसारखे विविध कार्यक्रम कार्यस्थळी घेण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांकाच्या मानकरी सौ.अनिता संतोष पाटील व द्वितीय क्रमांकाच्या मानकरी सौ. धनश्री विजय पाटील तसेच उत्तजनार्थ कु. मृणाली संजय पाटील यांनी बक्षीसे मिळवली.तसेच श्री बाळासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेड शाखा अध्यक्ष यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व शुक्रवार दि.20.09.2023 रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक महिलांच्या गौरी गणपतीची गाणी व पारंपरिक वाद्याने गावातून मिरवणूक पार पडली यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री धोंडीराम महादेव पाटील, उपाध्यक्ष मारुती शंकर चोगले, खजानीस श्रीकृष्ण यशवंत पाटील सचीव विजय तानाजी पाटील, शिवाजी पाटील,संतोष पाटील व कार्याध्यक्ष ओंकार धनंजय पाटील  तसेच विशेष सहकार्य महिला वर्ग व गावचे पोलिस पाटील श्री, शिवाजी कुंभार या सर्वांचे व गावकऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments