गांधीनगर बाजारपेठेत एैन सणासुदीच्या दिवसात भारनियमन होत असल्याने करवीर शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने.
गांधीनगर बाजारपेठेत एैन सणासुदीच्या दिवसात भारनियमन होत असल्याने करवीर शिवसेनेच्या( उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने गांधीनगर महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने.
---------------------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
---------------------------------------------------
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील होलसेल व रिटेल कापड व अन्य वस्तुंची बाजारपेठ आहे. सद्या गांधीनगर बाजार पेठ ही दिवाळी व दसरा या वस्तुंनी सजली आहे. सद्या ऑक्टोंबर हीट ही मोठया प्रमाणात असल्याने ऊनाचा तडाका ही मोठा आहे. सद्या बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. पण विजवितरण रिपेअरीच्या नावाखाली सतत भारनियमन करत आहे. त्यामुळे खरेदीला येणारा ग्राहक दुकानांमध्ये घामाघूम होत आहे. भारनियमनाची ही वेळ निश्चित नसल्याने कधीही केंव्हाही भारनियमन होत असल्याने, एकतर कार्यालयात फोन केला की, रिपेअरीचे नाव पुढे करत आहेत. तासंन तास व दरारोजची कसली ही रिपेअरी चालु आहे. हया बाजरपेठेमध्ये विजेची मोठी मागणी असल्याने त्याचा आकार ही मोठा आहे. जेणे करून विजवितरणला उत्पन्न स्वरूपात मोठी रक्कम ही मिळते. मग हे सततचे भारनियमन कसले. कर्मचारी ही विज का गेली, किती वाजता येणार, याचे उत्तर ही सरळ देत नाहीत. उध्दट उत्तरे देतात. ग्राहक ही गोंधळून जात आहे. ऐन सणासुदीच्या दिवसामध्ये रिपेअरी काढून ग्राहक व व्यापाऱ्यांना नाहक त्रास देवून पिळवणूक करण्याचा नेहमीचा उद्योग विजवितरण कंपनीने थांबवावा. अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडून घालण्याचे आंदोलन करू असा इशारा करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.या मागणीचे निवेदन मा. अश्विनकुमार सूर्यवंशी, सहाय्यक अभियंता, महावितरण कार्यालय, गांधीनगर यांना देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी यापुढे सणासुदीच्या काळात भारनियमन होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपजिल्हा समन्वयक विक्रम चौगुले,युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, फेरीवाला संघटनेचे उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे, दिपक पोपटाणी,दिपक धिंग, संजय काळूगडे, शिवाजी लोहार, नागेश शिरवाटे, सुनील पारपाणी,विरेंद्र भोपळे, शंकर चंदवानी, सागर माने, राजू जाधव, शाहनवाज जमादार, जितु चावला, किशोर कामरा,आबा जाधव,मनोज कुरळे आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment