Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर महाविद्यालयात सन २००७ साठी इयत्ता १२ वी कला या वर्गात शिकून पुढे गेलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात सन २००७ साठी इयत्ता १२ वी कला या वर्गात शिकून पुढे गेलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळावा संपन्न.



-----------------------------------------

वाई प्रतिनिधी

 कमलेश ढेकाणे

-----------------------------------------

विविध क्षेत्रांमध्ये कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे माजी विद्यार्थी म्हणजे महाविद्यालयाचे भूषण होय. त्यांनी सोबत नेलेली संस्काराची शिदोरी हाच समाज विकासाचा पाया असतो. म्हणून सर्वच माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनात महाविद्यालयाच्या स्मृती जपून ठेवाव्यात. असे उदगार जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी काढले.

येथील किसन वीर महाविद्यालयात सन २००७ साठी इयत्ता १२ वी कला या वर्गात शिकून पुढे गेलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्र. प्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच सेवानिवृत्त माधवराव गुरव, गणेश कोरे उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब कोकरे हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. जयवंत चौधरी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांवर विविध कला गुणांचे संस्कार रूजत असतात. त्यांचे मन, मनगट आणि मेंदू बळकट करणारी ही प्रयोगशाळा असते. विद्यार्थ्यांच्या तारुण्यातील उर्जेच्या विविध क्रिडा क्षेत्रांमध्ये नैपुण्य प्राप्त करण्यासाठी इथेच वाटा उजळण्याची प्रेरणा घेऊन ते पुढील जीवनाची वाटचाल करीत पुढे जातात. अशा माजी विद्यार्थ्यांमुळेच महाविद्यालयाच्या लौकिकामध्ये भर पडत राहते.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. (डॉ.) सुनील सावंत म्हणाले की, वयाच्या सोळाव्या वर्षात पदार्पण केलेले विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतात. विविध स्वप्नांना गवसणी घालण्याचे बळ त्यांना इथेच प्राप्त होते. त्यांच्या सळसळत्या तारुण्याला इथेच सुसंस्कारांचे वळण दिले जाते. भविष्यात हेच विद्यार्थी माजी विद्यार्थी म्हणून समाजात वावरतात त्यांच्या कर्तत्वाचा सुगंध समाजात दरवळत राहतो व महाविद्यालयास अशा माजी विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो.

याप्रसंगी सेवानिवृत्त माधवराव गुरव, सतिश सुर्यवंशी, गणेश कोरे, रमेश पिसाळ, सिकंदर अहिवळे, रजनी सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारी मनोगते व्यक्त केली. तसेच शीतल आब्राळे, धनश्री भोसले, वर्षा मोरे, माधवी मोतलिंग, अक्षय जायकर, संकेत गायकवाड, तानाजी मांढरे, अंकुश जाधव, रोहन बोडके इ. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी देशभक्त आबासाहेब वीर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करून मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सतिश तावरे, श्रावण पवार, वसंतराव चौधरी, सरोज वाघ, दत्तात्रय शिंदे, शकुंतला पाळवदे, निर्मला कणसे, दिनकर पाखरे, भरत गायकवाड, रमेश पिसाळ, सिकंदर अहिवळे, सतिश सूर्यवंशी, गणेश कोरे, माधवराव गुरव, रजनी सावंत, इ. सर्व गुरूवर्यांचा शॉल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी श्री. अविनाश कुंभार याने उपस्थित सर्व गुरूजन व विद्यार्थी यांचे आभार मानले. सूत्रसंचालन तुषार धिवार यांनी केले.

शीतल कळंबे, रीतेश लोखंडे, सपना जाधव, गौरव चोरट, सुदर्शन चव्हाण, सागर बागल, रेश्मा पिंगळे, जीवन भोसले, तानाजी मांढरे इ. माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments