Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा - लोणंद रस्ता वाहतुकीसाठी सात दिवस बंद: पोलिस अधीक्षक समीर शेख.

 सातारा - लोणंद रस्ता वाहतुकीसाठी सात दिवस बंद: पोलिस अधीक्षक समीर शेख.

सातारा लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीत असलेल्या काळी मोरी नावाचा जुना ब्रिटीश कालीन रेल्वे पूल नवीन रेल्वे लाईन तयार करण्यासाठी पाडण्यात येणार आहे त्यामुळे या मार्गावरुन सर्व वाहतूक सात दिवस बंद राहणार असल्याची अधिसूचना जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वाठार‌ स्टेशन जवळील असणारा काळि मोरी नावाचा ब्रिटीश कालीन रेल्वे पूल डबल रेल्वे लाईन तयार करण्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक टरनल विभाग पुणे यांनी वाठार पोलिस ठाणे, तसेच पोलिस अधीक्षक यांना पंधरा दिवसांसाठी या मार्गावरील वाहतूक  बंद करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र वाहतुकीचा, तसेच लोकांच्या मागणीचा विचार करून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवार दिनांक ६  ते १३ आकटोबर पर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक पुर्णपणे बंद करून ती फलटण व लोणंद बाजुने येणारी वाहने खंडाळा शिरवळ मार्गे पुणे बंगलोर महामार्गाने सातारा कडे येतील.तसेच सातारा कडून येणारी अवजड वाहने पुणे बंगलोर महामार्गाने खंडाळा शिरवळ वरुन लोणंद कडे जातील, फलटण व लोणंद वरुन येणारी सर्व प्रकारची वाहने व दुचाकी वाहने आदरकी फाटा येथुन तडवळे संमत वाघोली मार्गे पिंपोडे बुद्रुक वरून वाठार स्टेशन मार्गे सातारा कडे जातील., तसेच सातारा , कोरेगाव येथून लोणंद व फलटण बाजुकडे जाणारी सर्व प्रकारची हलकी वाहने व दुचाकी वाहने अंबवडे चौक मार्गे पिंपोडे बुद्रुक वरून तडवळे संमत वाघोली वरून लोणंद व फलटण कडे जातील, तरी या पर्यायी मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments