Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शांता शेळके' काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या 'शेणाला गेलेल्या पोरी' या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर....

 शांता शेळके' काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या 'शेणाला गेलेल्या पोरी' या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर....

   जेष्ठ कवयित्री स्वर्गीय शांता शेळके प्रतिष्ठान,मंचर, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'शांता शेळके' काव्य पुरस्कार राधानगरी येथील प्रा.चंद्रशेखर कांबळे यांच्या 'शेणाला गेलेल्या पोरी' या बहुचर्चित काव्य संग्रहाला जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी पायमोडे यांनी नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली 

    प्रसिद्ध कवी,लेखक,व्याख्याते व दलित साहित्य आणि चळवळीचे अभ्यासक म्हणून परिचित असलेले कांबळे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य आहेत.त्यांनी या दीर्घ कवितेतून कृषीजन्य समूहातील स्त्रियांचे भावविश्व व त्यांच्या जगण्याचे विविध कांगोरे शेणींच्या प्रतिकामधून चित्रित केले आहेत.

   अनेक मान्यवरांनी गौरवलेल्या या काव्यसंग्रहाला आजवर कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार,कर्जत,दक्षिण महाराष्ट्र्र साहित्य सभा,कोल्हापूर माय-बाप स्मृती पुरस्कार,पंढरपूर,

श्री शाहू पुरस्कार,शाहूवाडी,गावगाडा काव्य पुरस्कार, सोलापूर असे प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रखडलेले सलग तीन वर्षांचे पुरस्कार संस्थेने यंदा जाहीर केला असून सन २०-२१ साठी या पुस्तकाची निवड करण्यात आली. रोख रक्कम,शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून डिसेंम्बर २०२३ मध्ये मंचर येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्या पुरस्काराचे याचे वितरण होणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी पाय मोडे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments