Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भोगूलकरवाडी ता, राधानगरी येथील तरुणाचा बांधावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू.

 भोगूलकरवाडी ता, राधानगरी येथील तरुणाचा बांधावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू.

राधानगरी तालुक्यातील तळगाव पैकी भोगूलकरवाडी येथील प्रथमेश भोगूलकर वय 25 या युवकाचा वैरणीचा भारा घेऊन येत असताना बांधावरून पाय घसरून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

     याबाबत अधिक माहिती अशी की प्रथमेश हा सकाळी  साडेनऊच्या सुमारास कोंढार नावाच्या शेतामध्ये जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेला होता त्या शेतातून वैरणीचा भारा घेऊन येत असताना शेतातून वैरणीचा भारा घेऊन येत असताना त्याचा  बांधावरून पाय घसरून पडल्याने त्याला पुढील उपचारासाठी राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तो मृत झालेचे सांगितले, राधानगरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला,

 अधिक तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली, दत्तात्रय शिंदे व जठार हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments