Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक कमिटीची राधानगरी बस स्थानकास भेट.

 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक कमिटीची राधानगरी बस स्थानकास भेट.

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान या अभियान स्पर्धेमध्ये राधानगरी बस स्थानकाचा समावेश केला आहे त्यासाठी एस टी महामंडळाने कमिटी स्थापन केली आहे त्यामध्ये सांगली एसटी चे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे कामगार अधिकारी प्रवीण पाटील व संके क अधिकारी अनिल पार्ट यांनी राधानगरी बस स्थानक भेट देऊन त्यावेळी बस स्टँड बघून समाधान व्यक्त केले.

त्यानंतर कमिटीने मासुली एसटी व बस स्थानकावरील स्वच्छतागृह स्वच्छ आहे का याची पाहणी करण्यात आली त्यावेळी त्यांना स्वच्छ सुंदर असल्याचे समाधान वाटले..

स्वच्छ अभियान कमिटीमध्ये राधानगरी येथील पत्रकार विजय बकरे प्रवासी प्रतिनिधी मनोज परब यांचा समावेश होता त्यानंतर गोपनीय अहवाल तयार करून तयार करून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक कमिटी सांगलीचे प्रवीण पाटील व अनिल पार्टी यांच्याकडे देण्यात आला.

यावेळी राधानगरी एसटी आगार आगार व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी कमिटीचे प्रवीण पाटील अनिल पार्टी यांचा राधानगरी बस स्थानकामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास राधानगरी एसटीआगार  चे आगार व्यवस्थापक उत्तम पाटील बस स्थानकाचे स्थानक प्रमुख प्रकाश भारमल आगारातील अधिकारी व कर्मचारी वर्ग हजर होता.

Post a Comment

0 Comments