Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विभागीय योगासन स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देताना केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापक डी.टी.धनावडे,अशोक लकडे, शंकर ओंबळे,विश्वास भिसे,आशा साळुंखे.

 विभागीय योगासन स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देताना केंद्रप्रमुख अरविंद दळवी, मुख्याध्यापक डी.टी.धनावडे,अशोक लकडे, शंकर ओंबळे,विश्वास भिसे,आशा साळुंखे.


भणंग:- जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत भणंग प्राथमिक शाळेचे सुयश...

भणंगच्या दोन खेळाडूंची विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

       क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांचे वतीने दहिवडी येथे जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भणंग ता.जावली येथील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले.

         जिल्हास्तरावर १४ वर्षेखालील शालेय योगासन स्पर्धेत मुलांच्या गटांमध्ये आयुष शांताराम जाधव याने सातारा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आणि अर्णव जोतीराम जाधव याने सातारा जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळवत नेत्रदीपक कामगिरी केली.त्यांची इचलकरंजी सांगली येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          या विद्यार्थ्यांना योगशिक्षक डी.टी. धनावडे,अशोक लकडे,शंकर ओंबळे, विश्वास भिसे,आशा साळुंखे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. 

           भणंग शाळेतील खेळाडूंनी जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत मिळवलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल शिक्षणाधिकारी शबनम मुजावर,उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे,जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे,केंद्रप्रमुख अरविंद दळवी,भणंगचे सरपंच गणेश जगताप,उपसरपंच हाफीजा मोमीन आदि मान्यवरांसह शाळा व्यवस्थापन समिती, हनुमान उदय मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थ मंडळ भणंग,पालक, शिक्षक यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments