नागठाणे येथील चौघांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातुन हद्दपार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

 नागठाणे येथील चौघांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातुन हद्दपार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.

----------------------------

सातारा प्रतिनिधी 

किरण अडागळे. 

----------------------------

सातारा जिह्यातील कराड, बोरगाव,व उंब्रज तसेच सातारा पोलीस ठाण्याचे हद्दीत वारंवार शरीराविरूदध व मालमत्तेचे नुकसान करणारे गुन्हेगार नागठाणे येथील टोळीतील चौघांना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करणेची‌ कारवाई करण्यात १) अमर‌ उर्फ भरत संजय साळुंखे,वय २६, राहणार नागठाणे तालुका सातारा, टोळी प्रमुख,२) अमित उर्फ कन्हैया सुनील साळुंखे,वय२४ , राहणार नागठाणे,३) साहिल रुस्तम शिकलगार,२६, राहणार नागठाणे,४) आशिष बन्सीराम साळुंखे,वय२४ राहणार नागठाणे अशी त्यांची नावे आहेत. 

वरील सर्वांवर सातारा जिल्ह्यात खुन,जमाव जमवुन शिवीगाळ, दरोडा टाकणे,जबरी चोरी, घरफोडी करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, कायदेशीर ‌रखवालीमधुन पळून जाणे, खंडणी मागणी, अपहरण वगैरे बाबतीत गुन्हे दाखल असल्याने बोरगाव पोलीसांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सातारा जिल्ह्यातुन‌‌ हद्दपार करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता.

पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी सदर प्रस्तावास मान्यता दिल्याने वरील चौघांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रविंद्र तेलतुंबडे यांनी सदर टोळी विरोधात तडीपार करणेचे प्रस्ताव सादर केला होता.

 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अंतर्गत सदर कारवाई करण्यात आली आहे. याकामी  सरकार पक्षातर्फे अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर , पोलिस निरीक्षक ‌मधुकर गुरव, पोलिस नाईक प्रमोद सावंत, पोलिस नाईक केतन शिंदे , महिला पोलिस अनुराधा गुरव यांनी सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.