Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

विद्या मंदिर कोनोली ( राधानगरी ता. )येथील शाळेत जागर स्वावलंबी उपक्रम उत्साहात संपन्न.

 विद्या मंदिर कोनोली ( राधानगरी ता.  )येथील शाळेत जागर स्वावलंबी उपक्रम उत्साहात संपन्न.


---------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

आशिष पाटील 

---------------------------------------------

आज विद्यामंदिर कोनोली शाळेत जागर स्वावलंबी शिक्षणाचा हा उपक्रम संपन्न झाला. यामध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री डी एम पोवार सर यांनी केले .यानंतर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर माहिती सांगणारी विद्यार्थ्यांनी भाषणे केले. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचाल तर वाचाल हा संदेश रूजावा.या उद्देशाने वाचन प्रेरणा दिन संपन्न झाला .सर्व मुलांना अवांतर वाचनाचे पुस्तके देऊन एक तास मुलांच्याकडून वाचन करून घेण्यात आले. त्यानंतर श्री डी एस पाटील सर यांनी हात धुवा या  दिनानिमित्त हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले .व नेहमी अशाच पद्धतीने हात धुण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. यानंतर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रीचा कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम श्री.डीएम पोवार सर यांना पेपर विकत देऊन वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला .श्री सुहास पाटील सर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.श्री आनंदा पाटील सर यांनीआभार मानले.सौ.नंदा जाधव मॅडम तसेच कु.पूजा पाटील मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
Post a Comment

0 Comments