Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

देशाची हुकूमशाही कडे सुरू असणारी वाटचाल मोडीत काढू :- मुरलीधर जाधव.

 देशाची हुकूमशाही कडे सुरू असणारी वाटचाल मोडीत काढू :- मुरलीधर जाधव.

--------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

--------------------------------------

संपूर्ण महाराष्ट्रात 1 ऑक्टोबर 2023 पासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने च्या वतीने शिंदे-भाजपा सरकारच्या बोलघेवड्या  योजनांचा भांडाफोड करण्यासाठी होऊ दे चर्चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने आज मंगळवार  दि  3 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी चौक नागाव ता. हातकणंगले येथून या कार्यक्रमाला सुरवात झाली.यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकार व शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या देशातील चलनी नोटा, नाणी ज्याठिकाणी तयार होतात,त्याठिकाणचे 76000 कोटी रुपये नियमानुसार रिझर्व्ह बँकेकडे जमा होणे अपेक्षित आहे,पण अजूनपर्यंत ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा झाली नाही.तर ही रक्कम गेली कुठे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.हा पैसा कर्नाटक राज्य तसेच विविध राज्यात झालेल्या निवडणुकीत वापरला गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. 

या वेळी बोलताना शिव सेना जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी 

गॅस सिलिंडर ची भरमसाठ वाढ,महागाई यामुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.येणाऱ्या लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी हुकुमशाही मोडण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे राहावे,असे आव्हान त्यांनी केले. 

 श्री विवेक नागावकर यांनी गावातील सर्व गटातील शिव शैनिकांनी गट - तट  बाजूला ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साठी एकत्र येऊन येणाऱ्या काळात सोबत काम करनेचे आव्हान केले 


 यावेळी माजी आमदार सुजित मिनचेकर, माजी जिल्हापरिषद सदस्य महेश चव्हाण यांची भाषणे झाली. या सर्वानीच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवन,तालुका प्रमुख बाजीराव पाटील,माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत,सरपंच विमल शिंदे, शिवसेना विभाग प्रमुख भिकाजी सावंत,ग्रामपंचायत सदस्य श्रेयस नागावकर, अजित घाडगे,अभिनंदन सोळांकुरे माजी शाखाप्रमुख संजय चव्हाण उमाशंकर कोळी ,महंमद मुल्लानी,विवेक नागावकर, दीपक लंबे, अजय सावंत,दयासागर कांबळे,विध्याधर कांबळे संजय वडार, संजय शिंदे,सतिश लंबे यांच्यासह शिवसैनिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments