Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टी नवी मुंबई तर्फे नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा.

 आम आदमी पार्टी नवी मुंबई तर्फे नागरिकांच्या विविध समस्यांबाबत आयुक्तांकडे पाठपुरावा.

नवी मुंबई :- नवी मुंबई आम आदमी पार्टी चे नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश महादु ठाकुर यांच्या नेतृत्वात नवी मुंबईतील सामान्य जनतेचे प्रश्न घेवून आयुक्तांची भेट घेतली व सफाई कामगार,नवी मुंबई मधे नव्याने निर्माण झालेला पाणी प्रश्न,गेली दिडदोन वर्षे अपंगाचे स्टॅाल वितरीत झाले नाही , शाळा संदर्भात यामधे प्रामुख्याने हे विषय घेण्यात आले.मा.आयुक्त नार्वेकर साहेब यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत या विषयांकडे लक्ष दिले जाईल असे मत व्यक्त केले.यावेळी आपले मत व्यक्त करताना नवी मुंबई हे सुनियोजीत शहर असुन याठिकाणी सफाई कर्मचारी यांना नवी मुंबई महानगरपालिकेने अद्याप कायमस्वरुपी केले नाही ते लवकरात लवकर करण्यात यावे किंवा यात येणाऱ्या अडचणी याबाबत स्पष्टता द्यावी अन्यथा आम आदमी पार्टी हा लढा पुढे तीव्र करेल असे नवी मुंबई अध्यक्ष दिनेश महादु ठाकुर, नवी मुंबई मध्ये अनेक माजी नगरसेवक श्रेयवादाच्या लढाईत उद्घाटन उरकतात परंतु पुन्हा त्या वास्तुच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही असेच गेली दीड एक वर्षापासुन अपंगाचे स्टॅाल वितरीत करणे थांबले आहे.कारण फक्त श्रेयवाद परंतु यांच्या या श्रेयवादामुळे लाभार्थी लाभापासुन वंचित राहत आहे.


दिघा विभागात झालेली शाळेंची दुर्दशा दिघा विभागात शाळा क्र-१०८ मधील विद्यार्थी यांना व्यावसायीक गाळे यामधे शिकवलं जात आहे यामुळे आमची आयुक्त साहेब यांच्याकडे अशी मागणी आहे की त्यांची व्यवस्था करावी - संतोष रमेश केदारे अध्यक्ष आप युवा आघाडी यावेळी उपस्थित कार्यकर्ते चिन्मय गोडे -ठाणे जिल्हा संघटक युवा आघाडी,अभिषेक पांडे- संघटन मंत्री नवी मुंबई,अस्लम कुरेशी -आप व्यापारी आघाडी,सोहेल शेख - वार्ड क्र७२अध्यक्ष युवा आघाडी उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments