Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेत मामुर्डी शाळेने मारली बाजी.

 यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धेत मामुर्डी शाळेने मारली बाजी.

--------------------------------

  मेढा प्रतिनिधी

-------------------------------

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा (बीट स्तर) संपन्न झाल्या.

    जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत घवघवीत यश मिळवले.सांघिक स्पर्धेत मोठा गट- खो-खो मुली प्रथम क्रमांक,लहान गट- लंगडी मुले प्रथम क्रमांक,लंगडी मुली प्रथम क्रमांक

 तसेच वैयक्तिक स्पर्धेत लहान गटात

आयुष विठ्ठल सपकाळ -१०० मी.प्रथम ,अर्णव धोंडीबा मोरे-२००मी.द्वितिय ,सोहम शंकर धनावडे-४००मी. ,तृतिय कृमांक तृप्ती दत्तात्रय धनावडे-१००मी ,द्वितिय क्रमांक,अजय पवार-थाळी फेक प्रथम निर्मला परशुराम मुकणे-थाळी फेक द्वितीय क्रमांक,साक्षी मुकणे-गोळा फेक द्वितीय क्रमांक मिळवले 

     आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथील विद्यार्थ्यांनी स्व.यशवंतराव बालक्रीडा स्पर्धा -बीट स्तर अंतर्गत झालेल्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केलेबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ मंडळ ,श्री केदारेश्वर भजन मंडळ , विकास मंडळ मामुर्डी यांचे वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला‌.

   मामुर्डीचे सुपुत्र निखिल दत्तात्रय नारायण धनावडे  पुणे येथील मेडीकल व्यवसायीक यांनी त्यांचे जन्मदिवसाचे निमित्ताने विद्यार्थ्यांना १० किलो खारीक व १० किलो खोबरे भेट देऊन आपला वाढदिवस साजरा केला. तसेच ग्रामपंचायत सदस्या सविता सुनील पांडुरंग धनावडे यांनी विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून गुळ-शेंगदाणे भेट दिले. सामाजीक कार्यकर्त्या आरती सचिन किसन बिरामणे यांनी विद्यार्थ्यांना पोषक आहार म्हणून खारीक-खोबरे भेट दिले. सदर उपक्रमाबद्ल सर्वांचे कौतुक होत आहे यावेळी मामुर्डीचे सरपंच जगन्नाथ धनावडे,सदस्य बाजीराव धनावडे शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष दत्तात्रय दादु धनावडे, उपाध्यक्ष बजरंग चौधरी, राजेंद्र धनावडे , ज्ञानदेव गोविंदा धनावडे , सदस्या निता संदिप धनावडे , स्नेहल लोहार , अल्पना एकनाथ मोरे ,दिपाली धनावडे , सुषमा सपकाळ , मनीषा सपकाळ , डिगे वडापाव सेंटरचे सचिन उर्फे दादा बिरामणे तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments