Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सीमाभागातील गावठी दारू उध्वस्त! दहा लाखांची गावठी दारू नष्ट!

 सीमाभागातील गावठी दारू उध्वस्त! दहा लाखांची गावठी दारू नष्ट!

------------------------------------

अमरावती प्रतिनिधी

 पुंडलिकराव देशमुख

--------------------------------------

अमरावती महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमाभागात मोहाची अवैधरित्या तयार करण्यात येत होती त्या गावठी दारूच्या आड्ड्यावर मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला हि कारवाई शुक्रवारी दिवसभर सुरू होती.

या कारवाईबाबत अधिक माहिती अशी की 

मोर्शी चे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ निलेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना गावठी दारू व बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे त्या अंतर्गत तालुक्यासह मध्य प्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत दारु काढणारा व विक्री करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून  लाखांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्याच्या सपाटा सुरू केला आहे.

शुक्रवारी सकाळी मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड, सालवडी॑,भिवकुडी तसेच मध्य प्रदेश आठनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झूणकारी पाठनाका येथे मोठमोठ्या झाडाच्या आडोशाला सूरू असलेल्या सात ते आठ गावठी दारूच्या हातभट्या नष्ट करण्यात आल्या मोहाची सडलेली 250 लिटर दारु व दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा मिळुन 9 लाख 75 हाजाराचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.

पोलिसांची चाहूल लागताच गावठी दारू तयार करणाऱ्या आरोपींनी तेथून पलायन केले

या कारवाईत ठाणेदार श्रीराम लोखंडे यांच्या सह आठमेल पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकारी यांनी सहभाग घेतला.

मोर्शी येथून पुढे मध्य प्रदेश सीमाभागात मोहाची दारू तयार करण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे त्या दारुची तस्करी मोर्शी शहरांसह ग्रामीण भागात केली जाते काही महिन्यांपूर्वी तरोडा धानोरा येथील अवैध व विषारी दारु पिल्याने दोघांना प्राणास मुकावे लागले होते या घटनेनंतर पोलिसांनी गावठी दारूच्या विरोधात कारवाई करण्याचा सपाटाच सुरू केलेला आहे.

Post a Comment

0 Comments