इंडियन आर्मी मध्ये विक्रम डोईफोडे यांचे राधानगरी जंगी स्वागत.
इंडियन आर्मी मध्ये विक्रम डोईफोडे यांचे राधानगरी जंगी स्वागत.
राधानगरी पैकी जुने पेठ येथील विक्रम मालोजी डोईफोडे हा युवक इंडियन आर्मी टेक्निकल सोल्जर या पदासाठी भरती होऊन आज राधानगरी येथे आल्यावर त्यांचे जंगी स्वागत ग्रामपंचायत सदस्य संजय मुरगडे यांनी हार घालून केले.
त्यानंतर जीप सजवलेल्या जीपमधून विक्रम डोईफोडे यांचे राधानगरी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर विक्रम डोईफोडे यांचे जुने पेठ या गावांमध्ये महिलांनी रांगोळी काढलेल्या पाय घ ड्यातून चालत येत असताना विक्रम डोईफोडे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला व विक्रम यांनी आपल्या आई-वडिलांना सलामी दिली व मातोश्री यांच्या डोक्यावर आपली टोपी घालून त्यानंतर आईने त्याची टोपी त्याला घालून विक्रम याला ओवाळी केल्यानंतर विक्रम याने ग्रामदेवता अंबाबाई यांचे दर्शन घेतले.
यावेळी ग्रामस्थ महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने हजर होता. जंगी स्वागत.
Comments
Post a Comment