Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आठ ग्रा.पं. सदस्यांचे आरोप खोटे: सरपंच पाटोळे.

आठ ग्रा.पं. सदस्यांचे आरोप खोटे: सरपंच पाटोळे.


---------------------------------------------

 फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------------------------

गांधीनगर :-ग्रामपंचायत सदस्य रितू लालवानी यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी केलेले आरोप खोटे असून लोकनियुक्त सरपंच व अन्य ग्रामपंचायत सदस्यांची बदनामी करण्याचा हा डाव आहे. जनता त्याला भीक घालणार नाही, असे गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे व अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

रितू लालवानी यांनी आठ ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या असलेले लेखी पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले. त्यावर खुलासा करताना संदीप पाटोळे पुढे म्हणाले की, महसुली गाव नसल्याने वित्त आयोगाकडून येणारा निधी बंद झाला असल्याने विकासकामे झाली नाहीत. महसुली गाव होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बेकायदा बांधकामावर नियमाने कारवाई सुरू आहे,

कायमस्वरूपी ग्रामसेवकासाठी प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कृतीमुळे इंटिग्रेटेड एनर्जी इंजीनियरिंग कंपनीकडून जे एलइडी बल्ब व साहित्य घेतले होते त्याच्या बिलासाठी आमच्यावर जप्तीसारख्या कारवाईला सामोरे जावे लागले. याशिवाय मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जातील सही माझी नसल्याचे एका सदस्यांने सांगितले, तर दुसऱ्या एका सदस्याने तक्रार अर्ज मला वाचायला न देताच माझी सही घेतली आहे असे सांगितले.

 विकासासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत असताना काही तथाकथित ग्रामपंचायत सदस्य त्यात अडसर आणत आहेत. जनता त्यांना कधी माफ करणार नाही, असेही पाटोळे यांनी स्पष्ट केले. सचिन जोशी, उपसरपंच पुनम परमानंदनी, ग्रा.पं. सदस्य निवास तामगावे, सनी चंद्वानी गजेंद्र हेगडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.

Post a Comment

0 Comments