Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका पाच नोव्हेंबर रोजी होणार.

 राधानगरी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका पाच नोव्हेंबर रोजी होणार.

राधानगरी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका 5 नोव्हेंबर 23 रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली.

राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी सरवडे रामनवाडी फे जिवडे बारडवाडी चकेशरवाडी कसबा वाळवे मालवे न्यू करंजे चांदेकर वाडी फराळे व पालकरवाडी बारा ग्रामपंचाय ती पंचवार्षिक व त्याचबरोबर कोदवडे मासुरली हसणे या तीन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका पाच नोव्हेंबर रोजी होणार असून या ग्रामपंचायतीने 16 ते 20 ऑक्टोंबर 23 रोजी अर्ज भरण्या साठी राधानगरी राजश्री शाहू हॉल तहसीलदार कार्यालय येथे स्वीकारले जातील त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी करण्यात येणार आहे

तसेच उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेण्याची तारीख 25 ऑक्टोबर दुपारी तीन पर्यंत असून त्यानंतर बारा ग्रामपंचायत चे चित्र स्पष्ट होणार आहे त्यानंतर बारा ग्रामपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे तसेच बारा ग्रामपंचाय तिचे 5 नोव्हेंबर रोजी मतदान सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत घेण्यात येणार आहे मतमोजणी 6 नोव्हेंबर  23 रोजी होणार असल्याची माहिती शेवटी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली

Post a Comment

0 Comments