वाठार येथे युवतीचा खून! तात्काळ कारवाई करत वडगाव पोलीसांनी केले संशयीत आरोपीस जेरबंद!
वाठार येथे युवतीचा खून! तात्काळ कारवाई करत वडगाव पोलीसांनी केले संशयीत आरोपीस जेरबंद!
किणी वाठार येथील साखरवाडीतील वीट भट्टीवर राहणाऱ्या 19 वर्षीय पूजा खंडू आडगळे या युवतीचा खून करून तिचा मृतदेह पृथ्वी माध्यमिक विद्यालयाच्या पिछाडीस असणाऱ्या ओढ्यालगत एका झुडपात टाकलेला आढळून आल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी वाठार येथील सनी कांबळे या संशयितास पेटवडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
लातूर जिल्ह्यातील वांगजी गावातील खंडू बाबू आडगळे हे कुटुंबासह हातकणंगले तालुक्यातील वाठार येथील अनिल कुंभार यांच्या साखरवाडीतील वीटभट्टीवर गेल्या आठ वर्षापासून सहकुटुंब काम करत आहेत आणि तेथेच वीटभट्टीवर राहत होते. खंडू आडगळे यांना 19 वर्षीय पूजा नावाची मुलगी आहे. ती वाठार मधील दिपा फुटवेअर या चप्पल च्या दुकानात काम करत होती. सनी कांबळे हा युवक एक दोन वर्षापासून पूजाचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. याबाबत तिने वडिलांना ही घटना सांगितली होती. बंडू आडगळे आणि वीट भट्टी मालक अनिल कुंभार यांनी सनी कांबळेला भेटून मुलीला त्रास देऊ नको असे सांगितले होते. तरी तो त्रास देतच होता.9 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे पूजा ही कामावरून घरी जात होती.यावेळी रस्त्यावर कोणी नसल्याचा फायदा घेऊन सनी कांबळे यांने तिला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा खून करून पृथ्वी माध्यमिक हायस्कूलच्या पिछाडीस असणाऱ्या ओढ्याच्या झुडपात मृतदेह टाकून तो पसार झाला होता. इकडे आडगळे कुटुंब तिचा शोधा शोध करत होते पण ती सापडून येत नव्हती. मृतदेह कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. या परिसरातील शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने पेटवडगाव पोलीस ठाण्याला याबाबतची खबर दिली. पोलीस निरीक्षक भैरू तळेकर फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ रोहिणी साळोखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान खंडू आडगळे यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्याने हा मृतदेह मुलगी पूजा अडगळेचा असल्याचे सांगितले. याबाबत सनी कांबळे यानेच पूजावर अत्याचार करून तिचा खून केल्याची तक्रार खंडू अडगळे यांनी पेटवडगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ सनी कांबळे यास अटक केली असून मृतदेह शव विच्छेदनासाठी सी पी आर ला पाठवण्यात आला आहे.
या घटनेचा आधीक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ रोहिणी साळोखे या करीत आहेत
Comments
Post a Comment