दैनिक सकाळचे पत्रकार श्री प्रकाश नलवडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
दैनिक सकाळचे पत्रकार श्री प्रकाश नलवडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला.
-----------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------
सांगवडे ता.19 सांगवडेवाडी वाडी येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश नलवडे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला.त्यांचा वाढदिवस म्हणजे दिवसभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून साजरा केला जातो. वाढदिवसाच्या दिवशी आपण कार्यरत असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल सांगवडेवाडी या शाळेस नलवडे आणि प्रदीप येवारे परिवाराकडून दोन मोठे डस्टबिन तसेच मुलांना केक,पेन व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. शाळेच्या सर्व वर्गांची सजावट करण्यात आली.त्याचबरोबर सांगवडेवाडी येथील तीन अंगणवाडीतील, प्राथमिक शाळेतील, जिजाऊ ज्ञान मंदिर, हलसवडे येथील स्वराज्य ज्ञान मंदिर मुलांनाही खाऊचे वाटप करण्यात आले. नुकताच झालेल्या वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित साधून परिसरातील प्रदीप येवारे, लालासाहेब खोत, महादेव चव्हाण या वृत्तपत्र विक्रेत्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दुपारी मंगळवार पेठ कोल्हापूर येथील अंध शाळेतील अंध मुलांना फळे व बिस्किटपुडे वाटप करण्यात आले.
तसेच एक पत्रकार मित्र हे कॅन्सरने आजारी आहेत त्यांना रोख स्वरूपात मदत देण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे सांगवडे येथील कै.गोविंदराव टेंबे वाचनालयासाठी अध्यक्ष डॉ. महावीर पाटील यांचे कडे पुस्तक भेट देण्यात आले.
Comments
Post a Comment