Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जीवनात खेळायला महत्वपूर्ण स्थान - डॉ. सुरभी भोसले.

 जीवनात खेळायला महत्वपूर्ण स्थान - डॉ. सुरभी भोसले.

----------------------------------------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
--------------------------------------------------------------------

मानवी जीवनात सुखदुःखांचे अनेक प्रसंग येत राहतात त्यांच्यावर मात करण्यासाठी आपण सज्ज राहायला हवे. विविध खेळ खेळणारे खेळाडू खिलाडूवृत्तीने अशा प्रसंगांवर मात करू शकतात. मानवी जीवनात खेळाला महत्त्वाचे स्थान आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सुरभी भोसले यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील क्रीडा विभागाने आयोजित केलेला सातारा झोनल महिला कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सचिव मा. वैशाली खाडे प्रा.पाटील उपप्राचार्य प्रो. डॉ. सुनील सावंत यांची उपस्थिती होती.

मा. भोसले पुढे म्हणाल्या, प्रत्येकाने वैयक्तिक जीवनात एक खेळ निवडून खेळाचा आनंद घ्यावा. खेळ खेळणे ही प्रक्रिया आयुष्यभर चालू ठेवावी. खेळामुळे व्यक्तिमत्व प्रभावी बनते. त्यामुळे समस्येवर लवकर तोडगा निघतो व पुढे व्यायामाची आवड निर्माण होऊन शरीर तंदुरुस्त राहते.

अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य फगरे म्हणाले, आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने मागील स्पर्धांच्या तुलनेने चांगले यश मिळवले आहे. त्यामध्ये महिलांची संख्या भरघोस आहे. तुम्ही महिला कबड्डी खेळाच्या माध्यमातून आपल्या महाविद्यालयाचे व पुढे राज्य व देशाचे नाव उंचवावे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक कृष्णा महाविद्यालय, रेठरे द्वितीय क्रमांक आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा तृतीय क्रमांक सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय, कराड तर चतुर्थ क्रमांक किसन वीर महाविद्यालय, वाई यांनी पटकावले व स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला कुमारी हिने सूत्रसंचालन केले व कुमारी हिने आभार मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील महिला कबड्डी संघ तसेच संयोजक महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments