Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सोयाबीनचे भाव वाढणार शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये.

 सोयाबीनचे भाव वाढणार शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये.

   

  विष्णुपंत भुतेकर संस्थापक अध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी संघटना

महाराष्ट्रातील मुख नगदि पीक सोयाबीन आहे. देशातील एकूण उत्पादनापैकी 40%  सोयाबीनचे उत्पादन महाराष्ट्रात घेतले जाते. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो . विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील शेतकऱ्यांचे खरीपातील  मुख्य पीक सोयाबीन आसुन वर्षभराचे अर्थकारण सोयाबीन पीकावरच अवलंबून आसते. राज्यातील सोयाबीन उत्पादक सोयाबीनच्या बाजारातील भावा मुळे प्रचंड आडचणीत आला आसुन दहा वर्ष आधीचे दर आज मिळत आहेत. सोयाबीनच्या उत्पादन खर्चात मात्र दुप्पट वाढ झालेली आहे. एकरी उत्पादन घटले आसुन भाव पडल्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड कोंडीत सापडला आहे. शेतकरी पडेल त्या भावाने माल विकत आहेत काही ठिकाणी तीन हजार रूपये प्रती क्विंटल पासुन विक्रीस सुरुवात होत आहे.

      या पार्श्वभूमीवर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना  भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी आवाहन केले आहे. येत्या काही दिवसांत सोयाबीनचे भाव वाढणार आसुन देशात आणि मुख्य सोयाबीन उत्पादक आसणार्या चीन, ब्राझील, आमेरीकेत सुध्दा उत्पादन घटीचा अंदाज अमेरिकन कृषी विभागाने दिला आहे. आशा  परिस्थितीत राज्यातील शेतकर्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करू नये येत्या काळात सोयाबीनचे भाव वाढणार आसुन सरकारच्या हस्तक्षेपा मुळे नव्हे तर भौगोलिक परिस्थितीमुळेच भाव वाढणार आहेत. त्यामुळे शेतकर्यांनी गरज आसल्यास टप्प्या - टप्प्याने सोयाबीन विक्री करावी अथवा काही काळ विक्री थांबवण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून कडुन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments