Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको.

 मुरगूड येथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको.

------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

मुरगुड प्रतिनिधी 

जोतीराम कुंभार 

-------------------------------

 मुरगुड ता. कागल येथे 19 रोजी सकाळी दहा वाजता सर्व मराठा बांधव मराठा बांधवांना पाठिंबा देण्यासाठी शिवतिर्थावर एकत्र जमा झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा मोर्चा शिवतीर्थ पासून , एस. टी. स्टँड मार्गे बाजारपेठ, राणा प्रताप चौक , निपाणी फोंडा या राज्यमार्गावर हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान आरक्षण आमच्या हक्काच नाही कु नाच्या बापाच एक मराठा कोटी मराठा अशा घोषणानी परिसर दणानून सोडला.यावेळी स्वागत मयूर सावर्डेकर यांनी केले प्रास्ताविक ओंकार पोतदार व आनंदा मांगले, यांनी केले .यानंतर दिग्विजयसिंह पाटील , चंद्रकांत जाधव ,सुहास खराडे जगन्नाथ पुजारी , दगडू शेनवी ,दत्ता पाटील केनवडेकर ,जयसिंग भोसले सुखदेव येरूकर , भारमल एकनाथ देशमुख,विक्रांत साळुंखे आदी कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली तर आभार एस. व्हि. चौगुले सर यांनी मानले यावेळी मोर्चामध्ये सहभागी माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके , सर्जेराव भाट, राजेंद्र चव्हाण , डॉ सुनिल चौगले,युवराज सुर्यवंशी, दिपक परिट, दत्तात्रय मंडलिक, अभिजीत मिठके, विजय गोधडे, संदीप कलकुटकी, पांडुरंग मगदुम, देवानंद पाटील, संदीप भारमल, नेताजी कळांद्रे, अमर चौगले , मारुती रावण, सागर सापळे, सोमनाथ यरनाळकर,भरत लाड , आदी उपस्थित होते .यावेळी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments