राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गणेश लोळगे प्रथम.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गणेश लोळगे प्रथम.
---------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अशोकराव माने इंजीनियरिंग कॉलेज वडगांवचा गणेश ज्ञानदेव लोळगे यांने सदाशिवराव मंडलिक फिरता व कायमच्या चषकासह रोख पारितोषिक मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला.येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात आयोजित केलेल्या राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार होते .
उपप्राचार्य डॉ.टी. एम. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले .टाईमकिपर प्रा डी व्ही.गोरे.तसेच प्रा.सुशांत पाटील.प्रा.संजय हेरवाडे यांनी काम पाहिल.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा निकाल :प्रथम क्रमांक
गणेश ज्ञानदेव लोळगे - (जनसामान्याचे नेते खा. मंडलिक -अशोकराव माने इंजीनियरिंग कॉलेज वडगांव ) द्वितीय क्रमांक -सुफिया ईस्माईल नायकवडी (नवे शैक्षणिक धोरण - विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा ) ,तृतीय क्रमांक -
चैतव्य पुंडलिक कांबळे ( निसर्गकवी : ना. धो. महानोर - कर्मवीर हिरे महाविद्यालय, गारगोटी )
उत्तेजनार्थ चतुर्थ क्रमांक -विवेकानंद मारुती पाटील (निसर्गकवी : ना. धो . महानोर - भोगावती महाविद्यालय कुरुकली )उतेजनार्थ पाचवा क्रमांक -
अमृता पांडुरंग सागर ( निसर्गकवी : ना. धो महानोर महाराट्र प्रशासकीय सेवा कॉलेज, गडहिंग्लज )
परीक्षक म्हणून सिम्बॉयसिस गडहिंग्लज माजी मुख्याध्यापक दत्ता देशपांडे ,राधानगरी महाविद्यालयाचे डॉ .विश्वास पाटील , भैरेवाडी (आजरा ) येथील सुरेश दास यांनी काम पाहिले . या स्पर्धेसाठी महात्मा फुले दूध संस्था चिमगांव , जयशिवराय एज्युकेशन सोसायटी ,जय शिवराय सर्वंटस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी , जय शिवराय दूध संस्था मुरगुड ,राजश्री शाहू पतसंस्था मुरगुड ,अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी , कै महादेव होडगे सार्वजनिक ग्रंथालय हरळी बु. हे प्रायोजक लाभले आहेत .स्वागत व प्रास्ताविक डॉ उदय शिंदे यांनी केले .सूत्रसंचालन प्रा डॉ सौ.माणिक पाटील यांनी तर स्पर्धा समन्वयक डॉ. शिवाजी होडगे तर आभार यांनी मानले.
मुरगूड : वक्तृत्व स्पर्धचे बक्षीस वितरण करताना
डॉ. अर्जुन कुंभार , डॉ.टी. एम. पाटील , डॉ . शिवाजीराव होडगे व परीक्षक
छायाचित्र- जे. के . फोटो सुरुपली
Comments
Post a Comment