Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

साकेत दसरा उत्साहत साजरा.

 साकेत दसरा उत्साहत साजरा.

 

-------------------------------

व्हनाळी/प्रतिनिधी 

-----------------------------

सालाबाद प्रमाणे यंदा साके ता.कागल येथे दसरा सण मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सकाळी गावातील नवरातकरी महिला,पुरूष यांनी पुरणपोळीचा नेवैद्य,दही,भात तर मानाचे दंडवत घालत गावातून ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरापर्यत दर्शनासाठी गर्दी केली होती.  पंचक्रोशीतील नवसाला पावणारे दैवत श्री भैरवनाथ देवालय ठिकाणी गेली नऊ दिवस भक्ततांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती.

नवरात्र काळात  पुजारी मोहन गिरी, राजाराम गिरी यांनी विधीवत धार्मिक पुजा केली. नवरात्रीनिमित्त मंदिराला आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी गावातील बारा बलूतेदार सकाळी व सांयकाळी आरती करून विधीवत पुजाअर्चा करण्यासाठी हजेरी लावली. आज दस-यानिमित्त मंदिराभोवती देवाचा पालखी सोहळा संपन्न झाला. गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी माहेरवाशींनी गावातील महिला उपस्थित होत्या. यावेळी सरपंच सौ.सुशिला दगडू पोवार,उपसरपंच सौ.रंजना बाळासाहेब तुरंबे, आदी ग्रामस्त युवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments