सात बारावरून शेतकरी कुळाची नावे गायब झाल्याने शेतकरी संतप्त.
सात बारावरून शेतकरी कुळाची नावे गायब झाल्याने शेतकरी संतप्त.
सातारा: महसुली दप्तर संगणकिकृत झाले मात्र सातबारा जसा आहे तसा न राहिल्याने मात्र नवीन प्रश्न भेडसवायला लागला आहे, तो म्हणजे महसूल विभागाने शेतकरी कुळांची नावे गायब केली आहेत. त्यामुळे कोळेवाडी येथील बाधित शेतकऱ्यांची कुळे संघटित होऊन मोर्चा, रास्ता रोको आंदोलन, उपोषण अशा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. कोळेवाडी व शिंदेवाडी येथे याबाबत बैठक झाली. बैठकीला पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख वसंत राव भोसले, सचिन पाटील, कोळेवाडीचे उप सरपंच महादेव शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Comments
Post a Comment