Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोकसो अंतर्गत अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल.

 पोकसो अंतर्गत अत्याचार प्रकरणी युवकावर गुन्हा दाखल.

-------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------

 दुचाकीवरून पाठलाग करून युवतीला धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात ॠषिकेश होडे,वय १९‌राहणार स्वेद गंगा अपार्टमेंट, मंगळवार पेठ सातारा याच्यावर गुन्हा ‌ नोंदवण्यात आला आहे. राजवाडा परिसरात एक अल्पवयीन युवती आपल्या कुटुंबियांसह राहते. त्या युवतीचा होडे हा दुचाकीवरून पाठलाग करीत असे.पाठलाग करताना तो युवतीला दुचाकी वर बसण्यासाठी धमकावत असे. धमकावत एके दिवशी होडे याने घरी नेऊन अत्याचार केला. हा प्रकार कोणालाही सांगितला तर काढलेले अश्लील फोटो इतरांना पाठवण्याची धमकीही यावेळी त्याने दिली. मात्र वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून त्या युवतीने तिच्या कुटुंबीयांना ही माहिती दिली. यांची तक्रार पिडीत युवतीच्या कुंटुबियांनी नोंदवली असुन ॠषिकेश होडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.

Post a Comment

0 Comments