Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास नॅक परिषदेकडून " ए " मानाकंन!

 मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास नॅक परिषदेकडून " ए " मानाकंन! 

प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही गिरी 

मेढा ता. जावली येथील जयवंत प्रतिष्ठान हुमगाव संचलित आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयास,राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद,

( नॅक ) या  उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता देणाऱ्या संस्थेने, " ए " मानाकंन दिले असल्याची माहीतीमहाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ. अशोक व्ही. गिरी यांनी दिली.

मेढा येथील आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयाचे नुकतेच दि. १२ व १३ ऑक्टोबर २०२३ रोजी नॅक पीअर टीमद्वारे मूल्यांकन करण्यात आले.

महाविद्यालयातील दर्जेदार शैक्षणिक सुविधा, संशोधन,शैक्षणिक गुणवत्ता, क्रीडा व सांस्कृतिक विभाग,राष्ट्रीय सेवा योजना, सुसज्ज ग्रंथालय व किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण वर्ग आणि महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी या सर्व बाबींचा विचार करून या नॅक पिअर समितीने महाविद्यालयास

" ए " मानाकंन दिले आहे.हे महाविद्यालय "आयएसओ" मानांकित असून महाविद्यालयाने सर्वच्च क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.

या कामगिरीचे मूल्यांकन करुन समितीने महाविद्यालयास प्रतिष्ठित अशी ए ग्रेड दिली आहे.यापूर्वी महाविद्यालयास २०१२ साली सी व २०१७ साली बी+ ग्रेड मिळाली होती. सातत्यपूर्ण सुधारणा व दर्जेदार शिक्षण यामुळे आता महाविद्यालयास नॅकद्वारे ए मानांकन देण्यात आले आहे.

या  नॅक पीअर टीममध्ये गोवा विद्यापीठातील प्रा. डॉ. रामबल्लव रॉय, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातील प्रा. डॉ. नारायण प्रसाद व शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जम्मू येथील प्राचार्य डॉ. एकता गुप्ता यांचा समावेश होता.महाविद्यालयाला ए श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री मा. आमदार शशिकांत शिंदे, सचिव सौ. वैशाली शिंदे,संस्थेचे सर्व विश्वस्त तसेच मेढा व पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी,

महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉ.अशोक व्ही. गिरी,उपप्राचार्य डॉ. प्रमोद घाटगे,आय. क्यू. ए. सीचे समन्वयक प्रा.अमेय देसाई,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,आजी व माजी विध्यार्थी आणि पालक यांचे कौतुक व अभिनंदन केले आहे. महाविद्यालयांने मा.प्राचार्य. मेजर डॉ.अशोक गिरी यांच्या नेतत्त्वाखाली अतुलनीय यश संपादन केले असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे व त्यांच्या सर्व सहकारी यांचे कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments