Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गुरुवार परज येथे चार लाख एक्कावन्न हजार रुपयांचा अवैद्य गुठका सापडला.सातारा पोलिसांची दोघांवर कारवाई.

 गुरुवार परज येथे चार लाख एक्कावन्न हजार रुपयांचा अवैद्य गुठका सापडला.सातारा पोलिसांची दोघांवर कारवाई.

सातारा:मा. उपविभाग पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या गुप्त माहितीदाराकडून गुरुवार परज सातारा या ठिकाणी अवैध गुठका साठणूक केले असल्याचे समजले असता त्यांनी मा. परिविक्षाधीन उपाधीक्षक श्री अजय कोकाटे यांना सदर ठिकाणी माहिती प्राप्त करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर कारवाई कामी डी.बी.पथक पोलीस स्टाफ ,निर्भया पथक सातारा शहर.यांनी तपास करत खात्रीशीर माहिती प्राप्त करून खोलीमध्ये आर.एम.डी. गुठका विमल गुठका पान मसाला, असा 451960/ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर माल हा शाहिद सय्यद व जावेर सय्यद दोघे राहणार गुरुवार परज सातारा, यांनी विक्रीकरिता आणल्याचे समजुन आले. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक समीर शेख, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी, यांचे मार्गदर्शनाखाली मा. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री अजय कोकाटे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेंद्र जगताप, गुन्हेप्रकटीकरणाचे पोलीस उप निरीक्षक सुधीर मोरे,पो.कॉ अमित साळुंखे सुहास कदम मपो कॉ-काजल राठवडे, रेश्मा सोनावणे, पोलीस हवलदार-सुजीत भोसले, पो नाईक निलेश जाधव पो कॉ संतोष घाडगे, संतोष कचरे, यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments