Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक रस्ता अनधिकृत बांधकाम, उपभियंता, शाखा अभियंता कारवाईची मागणी, वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, जनआंदोलन, आमरण उपोषणाचा इशारा.

 तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक रस्ता अनधिकृत बांधकाम, उपभियंता, शाखा अभियंता कारवाईची मागणी, वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, जनआंदोलन, आमरण उपोषणाचा इशारा. 

--------------------------------

गांधीनगर प्रतिनिधी 

 संदिप शिंदे 

--------------------------------

गांधीनगर (ता. करवीर) : येथील तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक रस्ता म्हणजेच प्रमुख जिल्हा मार्ग गांधीनगर मेन रोड  अनधिकृत बांधकाम तात्कालीन उपभियंता, शाखा अभियंता यांची चौकशी होऊन  कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटक रस्ता म्हणजेच प्रमुख जिल्हा मार्ग गांधीनगर मेनरोड  सर्वोच्च न्यायालयाच्या जैसे थे आदेशाच्या पूर्वी व जैसे थे आदेशाच्या नंतर या रस्त्याच्या दूतर्फा झालेल्या अनधिकृत, बेकायदा बांधकामाची जबाबदारी निश्चित करून तत्कालीन उपभियंता, शाखा अभियंता यांची गांभीर्याने चौकशी होऊन  कायदेशीर कारवाई करण्यात यावी. रस्त्याच्या दुतर्फा जी  बेकायदा, विनापरवाना बांधकामे झाली आहेत.  बेकायदेशीर बांधकामधारकांना ज्या नोटीसा दिल्या गेल्या त्यानुसार कारवाई झाली का, जर ठोस कारवाई झाली असती तर अतिक्रमणाचे जंगल उभे राहिले नसते. म्हणून या कालावधीत जे संबंधित अधिकारी कार्यरत होते त्यांची चौकशी होऊन, जबाबदारी निश्चित करून, दोषारोप पत्र तयार करून अतिक्रमणास बळ देणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सत्वर कायदेशीर कारवाई व्हावी. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या नकाशामध्ये हा रस्ता शंभर फुटी दर्शवला आहे. जर शंभर फुटी रस्ता करायचा झाल्यास बऱ्याच इमारती जमीनदोस्त कराव्या लागतील. या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच शासकीय नियमांचा भंग करून बांधकामे झाली, हे सर्वश्रुत आहे. हा रस्ता मोठ्या गर्दीचा असल्याने भविष्यात तो शंभर फुटी होण्याची गरज आहे व गरज भासत आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांनी जर वेळीच योग्य व ठोस कारवाई केली असती व बेकायदा बांधकामधारकांना बळ दिले नसते तर इथे बेकायदा जंगलाचे साम्राज्य उभे राहिले नसते. जानेवारी २०१९ पासून ३० डिसेंबर २०२२ अखेर कालावधीतील बेकायदा बांधकामांची यादी तयार करून, ती कोणाच्या आशीर्वादाने झाली, संबंधितांना किती नोटीसा काढल्या, अंतिम नोटीसा किती काढल्या आणि किती बांधकामे जमीनदोस्त केली, याची चौकशी व्हावी. जर कारवाई झाली असे प्रशासनाचे म्हणणे असेल तर रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमणाचे जंगल उभारले कसे, याबाबत चौकशीत जाब विचारला जावा. कारण सध्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. वाहनांना ये - जा करण्यास मोठा अडथळा ठरत आहे. ॲम्बुलन्समधून गंभीर रुग्णाला या रस्त्यावरून येणे अग्निपरीक्षा ठरत आहे.  जीवघेण्या अतिक्रमणास पाठबळ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलनाबरोबरच प्रसंगी आमरण उपोषण करावे लागेल.  असा इशारा  वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला आहे. निवेदन देताना 

वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका अध्यक्ष

भिमराव गोंधळी,  करवीर उपाध्यक्ष रमेश पोवार, जिल्हा सचिव प्रताप तराळ, जिल्हा कोषाध्यक्ष विकास बाचणे,  

करवीर महासचिव अर्जुन गोंधळी,  जिल्हा संघटक

तानाजी काळे,  करवीर सचिव अर्जुन कांबळे,  शिवाजी कांबळे, अमर कांबळे, शंकर कांबळे, अशोक माने  उपस्थित होते. 

------------------------------------------------

फोटो ओळी 

कोल्हापूर  : निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर संजय तेली यांच्याकडे  

 निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी.       

Post a Comment

0 Comments