Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पुणा बेंगलोर हायवेवर विकासवाडी येथे झालेल्या अपघातात पती पत्नीचा मृत्यू.

 पुणा बेंगलोर हायवेवर विकासवाडी येथे झालेल्या अपघातात पती पत्नीचा मृत्यू.

निपाण तालुक्यातील बेनाडी गावच्या पती-पत्नीचा अपघाती मृत्यू, गुरुवार दिनांक पाच रोजी, भेंडवडे तालुका हातकणंगले येथील आपल्या आजारी नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या श्री संदीप बापूसो कोळी आणि त्यांची पत्नी राणी संदीप कोळी हे भेंडवडे गावावरून येत असताना के 23 इ यु  41 74 या मोटरसायकलला पाठीमागून येणाऱ्या अज्ञात  ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला इतकी जोराची धडक देऊन सुद्धा ट्रॅक्टर चालक थांबला नाही तसाच सुसाट वेगाने ट्रॅक्टर चालक न थांबता निघुन गेला असून सदरचा अपघात पुणे बेंगलोर हायवे वर विजयानंद पेट्रोल पंपाजवळ विकास वाडी गावच्या हद्दीत झाला असून सदर अपघाताची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये झाली असून पुढील तपास सहायक फौजदार श्री अविनाश पवार हे करत आहेत  दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या संदीप व राणी यांना दोन मुले असून घरची परिस्थिती गरिबीची आहे भेंडवडे तालुका हातकणंगले येथील आपल्या नातेवाईकांना भेटून येत असताना काळाने डाव साधला संदीप व राणीच्या अपघाती मृत्यू मुळे बेनाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

Post a Comment

0 Comments