Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हद्दवाढी विरोधात नागाव,शिरोली शिये मध्ये कडकडीत बंद.

 हद्दवाढी विरोधात नागाव,शिरोली शिये मध्ये कडकडीत बंद. 

--------------------------------------------------------------------------

--------------------------------------------------------------------------

आज 12ऑक्टोबर 2023 रोजी सर्व पक्षीय हद्दवाढ विरोधी समिती च्या वतीने केलेल्या आव्हानानुसार नागाव व शिये मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.अत्यावश्यक सेवा,दवाखाना,मेडिकल, पेट्रोल पंप वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्याची प्रक्रिया सुरू आहे,या प्रस्तावित  हद्दवाढी मध्ये शिरोली,नागाव,वळीवडे, गांधीनगर,मुडशिंगी,सरनोबतवाडी,गोकुळ शिरगाव,पाचगाव,मोरेवाडी, उजलाईवाडी,बालिंगे, कळंबा, उचगाव, वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे, शिये,शिंगणापूर, नागदेववाडी या गावासह,शिरोली एम आय डी सी व गोकूळ शिरगाव एम आय डी सी  चा समावेश आहे.या सर्वच गावामध्ये स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळून हद्दवाढीला विरोध दर्शविण्यात आला. टप्प्याटप्प्याने आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचे या गावातील लोकप्रतिनिधी नी सांगितले आहे.आजच्या या बंदमध्ये शिरोली व गोकूळ शिरगाव एम आय डी सी मात्र सुरू ठेवण्यात आल्या होता.येथील उद्योजकांशी संपर्क केला असता त्यांनी अशी भूमिका सांगितली की,आम्हा सर्व  उद्योजकांचा या हद्दवाढी ला विरोधच आहे,पण दिवाळी,दसरा समोर असलेने ऑटोमोबाईल कंपन्यांची ऑर्डर असलेने कंपन्या बंद ठेवता येणार नाहीत.पण इथून पुढच्या लढ्यात आम्ही हद्दवाढ विरोधी कृती समिती सोबत आहोत.तसेच 18 गावांतील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य,लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांना निवेदन देऊन हद्दवाढीला विरोध दर्शविला.

Post a Comment

0 Comments