गंगा प्रकाश हॉस्पिटल व ग्रामपंचायत हसणे यांच्या वतीने मोफत आरोग्य उपचार शिबीर संपन्न.
गंगा प्रकाश हॉस्पिटल व ग्रामपंचायत हसणे यांच्या वतीने मोफत आरोग्य उपचार शिबीर संपन्न.
-----------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी
विजय बकरे
-----------------------------------------
राधानगरी तालुक्यातील हसणे येथे गंगा प्रकाश हॉस्पिटल कोल्हापूर व ग्रामपंचायत हसणेयांच्या वतीने विशेष आरोग्य शीबिर घेण्यात आले या आरोग्य शिबिरात शासनाच्या विविध आरोग्यदायी योजनांची माहिती देण्यात आली. गंगा प्रकाश हॉस्पिटल यांनी कॅम्प मध्ये सुमारे २०० रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली तर ज्या रुग्णांना पुढील उपचाराची गरज होती त्यांना शासकीय योजनेतून मोफत उपचार करणार असल्याचे डॉ मिना पाटील कवडे यांनी माहिती दिली.
यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत पिवळ्या व केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत उपचार गंगा प्रकाश हॉस्पिटलमध्ये करण्यात येतात त्याचा लाभ घेण्याचं आवाहन डॉ पी आर पाटील - कवडे यांनी केले. ग्रामपंचायत हसणेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय पथकाचे स्वागत केलं.आरोग्य तपासणी शिबिरात फुफ्फुस रोग तपासणी डॉ. प्रकाश साळवी,जनरल मेडिसिन डॉ. प्रकाश दिक्षित ल,डॉ. पी. आर. पाटील (कवडे)डॉ मीना कवडे यांनी केले.या शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार आणि औषधे देण्यात आली.
Comments
Post a Comment