Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मतदीने.

 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मतदीने.

---------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

जावळी प्रतिनिधी

 शेखर जाधव

---------------------------------------------------

रोहिणी पाटील यांनी उभारला मधूमक्षिका पालन व्यवसाय.

पाटण तालुक्यातील सोनवडे येथील शेतकरी रोहिणी पाटील यांना महामंडळाच्या माध्यमातून 9 लाख 71 हजार रुपयाचे कर्ज उपलब्ध झाले आहे. या मिळालेल्या कर्जामधून त्यांनी चांगल्या पद्धतीने मधूमक्षिका पालन नावीन्यपूर्ण व्यवसाय चालू केला त्यांना महिन्याकाठी 40 ते 50 हजाराचे हमखास उत्पन्न मिळत आहे. त्यांची ही यशोगाथा...


रोहिणी पाटील या पाटण तालुक्यातील सोनवडे येथील शेतकरी. त्यांना 2 एकरशेती, शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून घर खर्च भागत नसे, त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ठरविले व खादी ग्रामोद्योग येथे जाऊन मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण घेतले. तसेच पुस्तक वाचनातून या व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतली, सदर व्यवसायाची माहिती घेण्यास 2 वर्षाचा कालावधी गेला, त्यामध्ये मधचाचणी असे अनेक प्रकारचे प्रशिक्षण घेण्यात आले.

व्यवसायाची सर्व माहिती घेतल्यानंतर स्वतःजवळच्या पैशामधून छोट्या प्रमाणात व्यवसायाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक तुषार उर्फ गणेश पाटील यांच्याकडून महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. महामंडळाचे जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने त्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नाडे शाखेत कर्जाचा प्रस्ताव सादर केला. बँकेने कागदपत्रांची पडताळणी करून रोहिणी पाटील यांना 9 लाख 71 हजार इतके कर्ज दिले, या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून 12% व्याजपरतावा दिला जात आहे. श्रीमती. पाटील यांनी 9 लाख 71 हजार रुपये खर्च करून सुसज्ज असा कृषिकन्या उद्योग समूह उभा करुन मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरु केला. बँकेचा हप्ता नियमितपणे भरत असल्याने त्यांना महामंडळाकडून 1 लाख 35 हजार 566 रुपयेचा व्याजपरतावा त्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

मधुमक्षिका पालन या व्यवसायासाठी 10 पेट्यापासून सुरुवात केलेल्या व्यवसायात आज 100च्यावर पेट्या आहेत. कृषिकन्या उद्योग समूह संचलित "Forest honey" यास्वतःच्या ब्रँडखाली त्यांनी तयार केलेला मध हा प्रतिकिलो 1 हजार 200 दराने जातो, वर्षाकाठी सुमारे 300-400 किलो मधाचे उत्पादन त्या घेतात..अंदाजे मासिक त्यांना40 ते50 हजाराचा निव्वळ नफा होत असल्याचे त्या सांगतात.

व्यवसायाची देखभाल त्या स्वतः व कुटुंबिय मिळूनकरतात, या महामंडळाच्या योजनेमुळे माझी आर्थिक परिस्थिती सुधारली असून जीवनमानातही बदल झाला आहे, महामंडळाकडील योजणांमुळे अनेक मराठा समाजातील तरुण उद्योजक, छोटे मोठे व्यवसाय सुरु करू शकले आहेत.  

आजपर्यंत सातारा जिल्ह्यात 5 हजार 15 मराठा उद्योजकांना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकेमार्फत सुमारे 443 कोटीचे कर्ज वाटप झाले असून महामंडळामार्फत आजपर्यंत 36 कोटीचा व्याजपरतावा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

असा करा अर्ज... उमेदवारांना कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्याwww.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर महामंडळाकडून उमेदवाराला "LOI" प्रमाणपत्र दिले जाते, ते मिळाल्यानंतर उमेदवार कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकतो.

कागदपत्रांची आवश्यकता.. रेशनकार्ड, बँकपासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, तहसीलदार उत्पन्नाचा 8 लाखाच्या आतील दाखला किंवा IT रिटर्न असतील तर पती-पत्नीचेअनिवार्य (8 लाखाच्या आतील)

महामंडळाचे निकष ... लाभार्थी हा हिंदू मराठा असावा, त्याचे वय 18 ते 60 वर्षे असावे, त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. त्याला मिळालेले कर्ज हे केवळ व्यवसायासाठी वापरणे बंधनकारक आहे.

छोटे मोठे व्यवसाय उभारणीसाठी जिल्ह्यातील मराठा समाजाततील युवक-युवतींनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, बॉम्बे रेस्टॉरंट उड्डणपुला जवळ, सातारा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सन्मवय मयुर घोरपडे यांनी केले.


 संकलन

 जिल्हा माहिती कार्यालय

Post a Comment

0 Comments