गांधीनगर साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली तिन पानी जुगार अड्ड्यावर कारवाई.रोख रक्कमेसह साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त!
गांधीनगर साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी केली तिन पानी जुगार अड्ड्यावर कारवाई.रोख रक्कमेसह साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त!
तावडे हॉटेल ते गांधीनगर रोडवरील एका घरामध्ये सुरू असणाऱ्या तीन पानी पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 17 लोकांच्या सह सहा लाख पाच हजार चा मुद्देमाल आणि रोख 52 हजार रुपये जप्त केला.या घटनेची आधीक माहिती अशी की ,
करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या उचगांव रोड वरील एका घरात विना परवाना तीन पानी पत्त्याचा जुगार पैसे लावून खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यानी पाळत ठेवून आज मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास धाड टाकली.या धाडी मध्ये
कमलेश इंद्रलाल दर्याणी, सुरेश पोपट माने,अविनाश गंगाधर सुतार,,बलराज उज्वल गवळी, अभिजीत राजाराम तोडकर, शुभम संदीप आळवेकर, मुकेश बलराम राजपुत,
गदर लमवेल सकटे,अजय तानाजी जाधव,
ओंकार राजेंद्र जाधव, मुरली ब्रिजलाल लुलानी,विर बबन जाधव, गणेश सुरेश गोसावी, मुकेश सुरेशलाल राजाणी, तानाजी रामु जाधव, रवि मदनलाल चंदवाणी,
रोषन दत्तत्रय माने,यांना ताब्यात घेऊन सहा लाख पाच हजार रुपयांच्या जुगार साहित्यासह ऐकून 13 मोबाईल,6 मोटारसायकल आणि रोख 52 हजार रुपये जप्त करण्यात आले. त्यांच्यावर 426/2020
मुंबई जुगार | प्रतिबधंक कायदा कलम 4 व 5 प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment