यशवंत ब्रिगेडमार्फत दीपावली भेट.
-------------------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
वडगाव प्रतिनिधि
भूपाल कांबळे
-------------------------------------------------
मानव सेवा हीच ईश्वर सेवा मानून गेली दहा वर्षापासून यशवंत ब्रिगेड व कोळेकर परिवारातर्फे ऊस तोड कामगार, विट भट्टी कामगार, झोपडपट्टीत राहणारे लोक इ. गोरगरीब लोकांना दीपावली फराळ व कपडे वाटप करण्यात येतात. तसेच शैक्षणिक वर्ष सुरू होताना शालेय साहित्य व गणवेश वाटप करण्यात येतात. यातून एकच उद्देश आहे की या लोकांची दीपावली आनंदाने साजरी झाली पाहिजे. तसेच शिक्षणाची गंगा या लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. शिक्षण मिळाल्यावरच ते सामाजिक व आर्थिक विकास करू शकतात. महिलांचे प्रश्न,मेंढपाळ प्रश्न, विद्यार्थी प्रश्न , धनगर आरक्षण अंमलबजावणीबाबत यशवंत ब्रिगेड सदैव अग्रेसर आहे व वंचितांच्या हक्कासाठी आणि बहुजनांच्या न्यायासाठी प्रयत्न करत आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सरकार दरबारी अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असू. असे यशवंत ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ संतोष कोळेकर यांनी सांगितले. दीपावली फराळ व कपडे वाटप करताना प्रा डॉ संतोष कोळेकर, अमोल गावडे, प्रकाश गोरड, रावसो रानगे, प्रकाश पुजारी, विजय अनुसे, मल्हार येडगे, नामदेव लांबोरे, बाळासाहेब बरकडे, प्रियंका बरकडे, प्रा. डॉ शैलजा कोळेकर, दीपाली तलवार, वैशाली धुरगुडे इ . उपस्थित होते.
0 Comments