Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुरगूड येथे शेट्टी यांची आज सभा.

 मुरगूड येथे शेट्टी यांची आज सभा.

-------------------------

मुरगूड प्रतिनिधी

ओंकार पोतदार 

---------------------

राजू शेट्टी यांच्यासमोर कोल्हापूर जिल्ह्यातील

कागल,राधानगरी,भुदरगड विविध भागातून आंदोलनास व्यापक लोकपाठिंबा मिळवण्याचे आव्हान उभे आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मुरगूड येथे होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

“गतवर्षी ज्या शेतकऱ्यांच्या लावणी उशिरा झाल्या त्यांची भूमिका ऊसदर आंदोलनाच्या बाजूची दिसून येते. त्यांचा ऊस पक्व होण्यासाठी अजून 15 तीन आठवडे एक महिना अवकाश आहे. त्यांना रिस्क घेण्यासाठी 15 दिवस स्पेस आहे. तेही आंदोलनात सहभागी आहेत. पण ज्या शेतकऱ्यांचा ऊस एक वर्षाहून अधिक शेतात उभा आहे अशा शेतकऱ्यांची घालमेल वाढली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस तुटून पडला आहे असे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाहतूकदारांची वाहने जाळपोळ तोडफोड रस्तारोकोमुळे अडली आहेत.अशा लोकांची दुःख वेगळी आहेत.


दसरा कालावधीत ज्या शेतकऱ्यांचे ऊस सुखरूप गळीतास गेले त्यांच्या लावणी आंतरपीक याचे नियोजन व्यवस्थित जमले आहे. पण अद्याप ज्यांची ऊस पीके शेतात उभी आहे त्यांच्यासाठी आंतरपीक कसे घ्यायचे ? ऊस लावण केव्हा करायची ? आणि ऊस व आंतरपिकांची लावण उशिरा झाली तर मार्च एप्रिल महिन्यापर्यंत

पाण्याचे व्यवस्थापन कसे होणार ? या प्रश्नांची भ्रांत आहे.आंतरपीक-वैरण झाली नाही तर वर्षभर दुभत्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाणी जपून वापरावे लागणार आहे.केव्हाही उपसा बंदी लागू शकते फेब्रुवारी मार्च महिन्यात भर उन्हात हाती आलेली पिके वाळण्याचा धोका आहे.”

असे अनेक विषय-समस्या ऊस दर आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चेला येत आहेत.


शेतकरी खुलेपणाने बोलत आहेत. राजकीय पक्ष नेत्यांचे साखर कारखाने त्यांचे कार्यकर्ते समर्थक ऊस आंदोलनात सहभागी नाहीत. यापूर्वी राजू शेट्टी यांच्या ऊसदर आंदोलनाला लाभलेला उत्स्फूर्त लोक प्रतिसाद यावर्षी दिसत नाही. अनेक कारणांमुळे राजू शेट्टी यांच्या ऊसदराच्या आंदोलनाला ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुरगूड ता.कागल येथे गुरुवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वाजता होणारी सभा महत्त्वाची आहे. सभेकडे सर्वसामान्य शेतकरी आणि साखर कारखानदार राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे.या सभेनंतर राजू शेट्टी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना आंदोलनाशी जोडू शकले तर आंदोलन अधिक बळकट होऊ शकते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रोश यात्रेनंतर राजू शेट्टी दुसऱ्यांदा मुरगुड मध्ये जाहीर सभेसाठी येत आहेत.

Post a Comment

0 Comments