सातारा स्थानिक गुन्हे शाखेची राज्यात मान उंचावेल अशी स्तुत्य कामगिरी.
-------------------------------
सातारा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-------------------------------
राज्यभरातच न्हवे तर अन्य राज्यात देखील घरफोडी करून धूम स्टाईलने पसार होणारी ktm बाईकस्वार टोळी जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, सातारा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, सातारा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा पोलीस निरीक्षक श्री.अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना सातारा येथे विविध ठिकाणी घरफोड्या करणारी ktm टोळी पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने कर्तव्य बजावत पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांनी सदर गँग ला पकडण्याकरिता सपोनि सुधीर पाटील, रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास सिंगाडे, अमित पाटील यांच्या अधीपत्याखाली तपास पथके तयार केली होती.सदर च्या गँग ने साताऱ्यात येऊन दोन ते तीन मोटार सायकलीने बंद घराचे सर्वेक्षण करून घरफोडी करून धूम स्टाईल ने 120ते 140 च्या स्पीड ने पळून जायचे सत्र लावले होते,सदर आरोपीबाबत काही एक माहिती लागत न्हवती, पण त्याचा शोध पोलीस स्टाईल ने घेऊन श्री अरुण देवकर यांनी एक गोपनीय बातमीदार तयार करून त्यास पौड यवत परिसरात ठेऊन,टोळीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते, नमूद बातमीदार सलग 3 महिने पुणे, पौड,यवत,मुळशी परिसरात बारकाईने लक्ष ठेऊन होता व त्याची माहिती वेळोवेळी पोलीस निरीक्षक देवकर यांना देत होता. ऑगस्ट 2023 मध्ये बातमीदाराने ktm टोळीतील 3 आरोपी पौड (जि.पुणे)परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिली.त्याप्रमाणे त्यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील यांच्या पथकाला नमूद आरोपीचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे नमूद पथकाणे पौड तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील डोंगर दारितील भागात भर पावसात सापळा रचून आरोपी (1)सुरदेव सिलोन नानावत. राहणार घोटावडे तालुका मुळशी, जिल्हा पुणे. (2) राम धारा बिरावत. राहणार करमोळी, पोस्ट-पौड तालुका मुळाशी जिल्हा पुणे.(3) परदुम सिलोन नानावत. राहणार घोटावडे, तालुका मुळशी जिल्हा पुणे.ह्या सर्वांना पोलिसांनी मुसक्या आवळत ताब्यात घेतले 454.457.380. ह्या कालमान्वये. पोलीस कस्टडी घेतल्यावर आरोपीकडून गुन्ह्याची सविस्तर हकीकत जाणून घेतली पैकी आरोपीनी सातारा तालुका, मेढा, बोरगावं, खंडाळा, शिरवळ भुईंज, वाई,वाठार,उंब्रज, मल्हारपेठ वडूज, कराड तालुका,अशा विविध ठिकाणी घरफोड्या करून सोन्या चांदीचा माल हा गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील महिला सोनार तसेच सोनपालसिंग नारायणसिंग रजपूत व प्रदीप आसनदास खटवानी यांना विकले असल्याचे सांगितले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांनी तपास पथकासह पुन्हा गुजरात राज्यात जाऊन आरोपींनी सोने ज्या सोनाराकडे गहाण ठेवले होते त्या सोनारांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या-चांदीच्या दागिन्यांपैकी, चालू बाजार भावाप्रमाणे ६३,३०,५८०/- रुपये किंमतीचे १०३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ३,८८,५००/- रुपये किंमतीचे ५ किलो वजनाचे चांदीचे दागिने हस्तगत करून सातारा जिल्ह्यातील मुद्देमाल परराज्यात गुजरात येथे जाऊन हस्तगत करण्याची विक्रमी कामगिरी केलेली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी माहे नोव्हेंबर २०२२ पासून आतापर्यंत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, असे एकूण ११५ मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणले असून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 338 तोळे सोने (३ किलो ३८० ग्रॅम) असा एकूण २,०६,१८०००/- (दोन कोटी सहा लाख अठरा हजार रुपये) व ४,४४,०००/- रुपये किंमतीचे ६ किलो वजनाचे चांदीचे दागिने, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
0 Comments