Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

.मेढा बाजार पेठेतील फुटपाथ वर व्यापार्‍याचे साम्राज्य.

 .मेढा बाजार पेठेतील फुटपाथ वर व्यापार्‍याचे साम्राज्य.


जावलीची राजधानी म्हणून मेढा नगर पंचायतीला ओळख आहे जावली तालुक्यातील मनी बँक मानणे हि वावगे ठरणार नाही .

मेढा ग्राम पंचायत असताना ही मेढा बाजार पेठेत रहदारी असायची . जावलीतील प्रत्येक नागरिक कोणत्या ना कोणत्या कामा निमित्त दररोज येणे भागच आहे . ते मग घरगुती बाजार असो कि बँक काम असो किंवा तहसिल कार्यालयात कामा निमित्त असो मेढ्यात आल्याशिवाय काम होतच नाही . त्यामुळे रोज हजारो लोक मेढा येथे रोज येजा करत आहेत

. मेढा ग्राम पंचायतील ग्रेड मिळूण नगर पंचायतीचा दर्जा मिळाला आहे . तरीसुध्दा आठवडा बाजार जसा पहिला भरत होता तसाच आताही आहे बाजार करण्यास येणाऱ्या नागरिकांना कोणतीही सोय नाही त्यात आता मेढ्याच्या बाजार पेठ्यातून विटा महाबळेश्वर हा महामार्ग गेला आहे. त्यामुळे बाजार करण्यास येणाऱ्या नागरिकांना फुटपात नसल्या कारणाने रस्त्यावरूनच जीव मुठीत घेऊन गाड्याच्या गर्दीतून रस्ता शोधावा लागतोय .

खेड्यापाडयातून येणाऱ्या भाबड्या बायका गर्दीतून प्रवास कसा करायचा ह्याचे ज्ञान नसाल्यामुळे अनेक अपघात होत असतात .

तर मेढा नगर पंचायतीने मेढा बाजार पेठेतील फुटपाथ वरील अतिक्रमण काढून फुटपाथ मोकळा करावा हि जणतेतून मागणी होत आहे . फुटपाथ असतात तरी कशासाठी ? फुटपाथ ही मालमत्ता नगर पंचायतीच्या मालकीची कि व्यापाऱ्याच्या मालकीची हा प्रश्न जनतेला पडल्याशिवाय राहत नाही .

Post a Comment

0 Comments