Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे अस्तित्व धोक्यात!

 रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे अस्तित्व धोक्यात!


--------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

नागाव प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

--------------------------------------

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अडव्होकेट माणीक शिंदे यांना मिळाली अवघी 28 मते

शिये ता करवीर येथील ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 4 मधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी हि पोटनिवडणूक लागली होती या पोटनिवडणुक राजाराम शिंदे (406) सुवर्णा पाटील यांना (403) तर रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणीक शिंदे यांना अवघी 28 मते पडली राजाराम शिंदे यांचा अवघ्या तीन मतांनी विजय झाला.

या निवडणुकीत रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माणीक शिंदे यांना अवघी 28 मते पडली असल्याने शिये येथील मतदारांमध्ये रघुनाथदादा शेतकरी संघटनेचे अस्तित्व धोक्यात असल्याचे बोलले जात आहे 

तर नेते एका बाजूला आणि कार्यकर्ते एका बाजूला अशी परस्तीथी निर्माण झालेली असताना सर्व जाती धर्माच्या लोकांनी व्याप्त असलेल्ल्या वार्डात कार्यकर्त्याने बाजी मारलेने राजाराम शिंदे आणि त्यांच्यासाठी झटणाऱ्या सर्व मित्रपरिवाराचे विशेष कौतूक होत आहे

Post a Comment

0 Comments