Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

वळीवडेतील ओढ्यावरील अवैध बांधकाम हटवा: वंचित बहुजन आघाडीचे करवीर अध्यक्ष भीमराव गोंधळी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

 वळीवडेतील ओढ्यावरील अवैध बांधकाम हटवा:  वंचित बहुजन आघाडीचे करवीर अध्यक्ष भीमराव गोंधळी यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २१५ ब मध्ये अशोक नारायणदास पंजवानी, दीपक पंजवानी, श्यामलाल पंजवानी यांनी विनापरवाना, बेकायदा, राज्य शासनाच्या विविध नियम व अटींचा भंग करून बांधकाम सुरू केले आहे.  हे बांधकाम ओढ्यावर अतिक्रमण करून सुरू आहे. याबाबत वळीवडे ग्रामपंचायत, कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे तक्रारी होऊनही संबंधित बांधकाम राजरोस सुरू आहे. येत्या सात दिवसात सदर बांधकामावर कारवाई होऊन ते जमीनदोस्त करावे, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर गुरुवार दिनांक ९-११-२०२३ पासून आमरण उपोषण इशारा.

वंचित बहुजन विकास आघाडीचे करवीर तालुका अध्यक्ष भीमराव गोंधळी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,

वळीवडे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक २१५ ब या भूखंडावर व लगतच्या शासकीय ओढ्यावर अतिक्रमण करून वर उल्लेखित व्यक्ती बेकायदा बांधकाम करत आहेत. याबाबत वळीवडे ग्रामपंचायत, कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद कोल्हापूर, पंचायत समिती करवीर अशा संबंधित विभागामध्ये लेखी तोंडी तक्रारी झालेल्या आहेत. तरीसुद्धा हे बांधकाम संबंधित प्रशासनाच्या आशीर्वादाने राजरोस सुरू आहे. दिवसाढवळ्या शासकीय ओढ्यावर बांधकाम करून ओढ्याची चोरी सुरू असताना वळीवडे ग्रामपंचायतसह संबंधित शासकीय प्रशासन मूग गिळून का गप्प आहे? या परिसरात लँड माफीयांनी प्रशासनातील कच्च्या दूव्यांचा आधार घेत बेकायदा  बांधकाम सुरू ठेवले आहे. वास्तविक यापूर्वीच या बेकायदा बांधकामावर कारवाई होऊन ते जमीनदोस्त झाले पाहिजे होते. पण तसे झाले नाही. येत्या सात दिवसात या बांधकामावर कारवाई होऊन ते जमीनदस्त न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर गुरुवार दिनांक ९-११-२०२३ पासून आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाच्या परिणामाची जबाबदारी घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदन स्वीकारताना निवेदन स्वीकारताना मा.संजय तेली 

निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी कोल्हापूर,

फोटो ओळ:

वळीवडे तील अवैध बांधकाम हटविण्याची मागणी करताना 

मा.भिमराव गोंधळी वंचित बहुजन आघाडी करवीर तालुका अध्यक्ष, प्रताप तराळ जिल्हा सचिव, मल्हार शिर्के महासचिव कोल्हापूर, विकास बाचणे जिल्हा कोषाध्यक्ष, संदिप गोंधळी आदी.                                    (छाया .संदिप शिंदे  )

Post a Comment

0 Comments