कोगील खुर्द मध्ये बिबट्याचे आगमन बिबट्याने पळवले मेढींच पिल्लू.

 कोगील खुर्द मध्ये बिबट्याचे आगमन बिबट्याने पळवले मेढींच पिल्लू.

-----------------------------------

 कोगील खुर्द प्रतिनिधी

भैरवनाथ संकपाळ.

------------------------------------

 कोगील खुर्द मध्ये मच्छिंद्र चव्हाण यांच्या शेतात कोगील बुद्रुक येथील इराप्पा धनगर यांनी आपल्या मेंढ्या बसवल्या होत्या रात्री दहा अकरा वाजण्याच्या सुमारास इराप्पा धनगर मेंढ्या वाघऱ्यात बसवून जेवण करत असताना बिबट्याने मेंढ्या असलेल्या वाघऱ्यावर हल्ला चढवला वाघऱ्यातील मेंदीचे पिल्लू पळवून नेले मेंढरं का ओरडत आहे म्हणून इराप्पा धनगर यांनी इकडं तिकडं बघितलं असता मेढराच पिल्लू बिबट्याच्या तोंडामध्ये धरून अंधारात निघून गेल्याचे दिसले अशी माहिती समोर येत आहे मागील दोन महिन्यापूर्वी याच परिसरात बिबट्याचा वावर होता यामुळे कोगील खुर्द मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सतर्कतेचा इशारा दिला आहे.



Comments

Popular posts from this blog

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.