Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

डॉ.सुभाष कदम यांचा सामजिक उपक्रम.

 डॉ.सुभाष कदम यांचा सामजिक उपक्रम.

-----------------------------

परभणी/प्रतिनिधी

-----------------------------

पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोडणीच्या निमित्ताने गावोगावी भटकंती करणाऱ्या ऊस कामगारांचं हातावरच जगणं, खरं तर कष्टाचं आणि जिकिरीचं असतं. ऊसतोड करून इतरांच्या जीवनात साखररुपी गोडवा आणणाऱ्या कामगारांच्या नशिबी मात्र ना दसरा ना दिवाळी! 

जिल्ह्यात मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर बाहेरगावाहून आले आहेत. त्यांना घरची आठवण येऊ नये म्हणून भाजपचे नेते डॉ.सुभाष कदम यांनी मजुरांसोबत दिवाळी साजरी केली.


 यावेळी डॉ. सुभाष कदम, श्री माधव चव्हाण, श्री शिवाजीराव मव्हाळे (जिल्हा सरचिटणीस भाजप परभणी ग्रामीण), श्री सुशील रेवडकर, श्री दत्तराव माने,जगन्नाथ यादव, ओंकार यादव, परमेश्वर यादव, सलीम पठाण,राजेश मव्हाळे,राम शिंदे,विठ्ठल चौकट, चेअरमन रमेशराव मोकाशे, रघुनाथराव मोकाशे इत्यादी कार्यकर्ते मिळून 50 कुटुंबाच्या भेटी घेऊन त्यांना दिवाळीच्या व भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. फराळ व भाऊबीज म्हणून साडीचोळी देण्यात आली.

महागाईच्या चटक्याने होरपळल्याने मजुरांसोबत असलेल्या तांड्यातील आपल्या चिमुकल्या जीवांना दिवाळीला गोडधोड देण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे देणे पारखे होते.अशावेळी या चिमुकल्यांसाठी दिवाळीचा गोड फराळ देऊन, त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत, आपल्यासोबतच इतरांची दिवाळी ही आनंदाने साजरा होण्यातच आनंद मानणारी माणसेही आहेत. भारतीय जनता पार्टीचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसोबत अनोखी दिवाळी साजरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी ऊसतोड कामगार यांच्यासोबत दिवाळी फराळ वाटप करून कामगारांची दिवाळी गोड केली.


 ऊसतोड कामगार ऊस तोडणीस निघाल्यानंतर दिवाळी पूर्वीचा कोणताही सण- उत्सव त्यांच्या नशिबात नसतो. आपले परिवार सोबत घेऊन ऊसतोडीसाठी निघतात. पाच महिने मजूर बाहेर गावीच राहतात. आपल्या लहान मुलांसोबत हे मजूर ऊस तोडीसाठी येत असतात. महागाईमुळे आपली दिवाळी गोड कशी होईल हा देखील मजुरांसमोर प्रश्न असतो. पाच महिने ऊसतोड करायची व त्या मिळालेल्या मजुरीतून वर्षभर हे मजूर आपला प्रपंच भागवतात.

Post a Comment

0 Comments