Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगरमधील मोबाईल चोरट्यास अटक.

 गांधीनगरमधील मोबाईल चोरट्यास अटक.

-------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी 

शशिकांत कुंभार 

-------------------------------------------

गांधीनगर : (ता. करवीर) येथील विशाल विजय छाबडा (वय २३, कुट्यामंदिरजवळ, गांधीनगर) याला दहा हजार रुपये किमतीच्या मोबाईल हँडसेट चोरीबद्दल अटक केली.

तावडे हॉटेलनजीक गर्दीमध्ये अमनकुमार नरेश सिंग (रा. उचगाव) यांचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याबाबत सिंग यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपासाअंती संशयित म्हणून विशाल छाबडा याला ताब्यात घेतले. त्याने विवो कंपनीचा हँडसेट चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला अटक केली असून त्याच्याकडून हँडसेट जप्त करण्यात आला.

गांधीनगर पोलीस ठाण्याचे तात्कालिक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या काळात 140 घरफोड्यासह किरकोळ चोऱ्या झाल्या होत्या त्यामधील अपवाद वगळता आजतागायत झालेल्या चोऱ्यांचा तपास आज तागायत लागलेला नाही.

नुतन गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील यानी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखाली गांधीनगर डीबी पथकातील हेड कॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर, सचिन सावंत, संदीप कुंभार, संतोष कांबळे यांनी 7 ते 8 चोऱ्यांचा तपास पूर्ण करून आरोपींना गजाआड केले आहे

Post a Comment

0 Comments