बाजरीची सहा पोती चोरल्या प्रकरणी अतीत येथील एकावर बोरगावं पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-----------------------------------------------फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
-----------------------------------------------
दिनांक 1/ 11/2023 रोजीच्या सकाळी 7.00 वा संध्याकाळी 7.00 वा चे दरम्यान व दिनांक 8/11/23 रोजीच्या सायंकाळी चार सुमारास मौजे जांभळेवाडी तालुका जिल्हा सातारा जांभळेवाडी कमानी जवळील मोकळ्या जागेमधील महादू झिपा सोनवणे. रा. जांभळेवाडी कामानिपाशी यांच्या खोपी मधून आर्यन सूर्यकांत जाधव व वी. स. बालक. राहणार अतीत तालुका जिल्हा सातारा यांनी आपसात संगणमत करून खोपीच्या पाठीमागील बाजूचे ताडपत्री उचलून खोपी उचकटून खोपी प्रवेश करून खोपे मधील प्रत्येकी 50 किलो वजनाचे 6 बाजरीची पोती येणेप्रमाणे एकत्रित वजन 300 किलो वजनाची व 35 रुपये प्रति किलो प्रमाणे एकूण 10,500 रुपये किमतीची बाजरीची पोती काळ्या रंगाच्या हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर मॉडेलच्या मोटरसायकल क्रमांक MH 09AV 3641 वरून चोरून नेली म्हणून त्याच्याविरुद्ध तक्रार महादू झिपा सोनवणे. रा जांभळेवाडी. ता /जि सातारा यांनी केली.
वाहन-- हिरो होंडा कंपनीच्या स्प्लेंडर मॉडेलच्या मोटरसायकल क्रमांक MH 09AV 3641 अशा प्रकारे तक्रारीत नमूद केले होते. सदर गुन्ह्याबाबत बोरगावं पोलीस स्टेशन चे स.पोलीस निरीक्षक तैलतुबडे यांनी तपास करून दोन्ही आरोपीना अटक केली आहे. अधिक चा तपास सहाय्यक पोलीस फौजदार कारळे हे करत आहेत.
0 Comments