Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राजाचे कुर्ले येथून लोखंडी पोल चोरणाऱ्या सात आरोपींना अटक. चोरीस गेलेल्या साहित्यासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, औंध पोलिसांची कारवाई.

 राजाचे कुर्ले येथून लोखंडी पोल चोरणाऱ्या सात आरोपींना अटक. चोरीस गेलेल्या साहित्यासह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त, औंध पोलिसांची कारवाई.

------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

 अमर इंदलकर     

------------------------------------

 रोजीचे रात्री औंध पोलीस ठाणे हद्दीतील राजाचे कुर्ले येथील डोंगरपायथ्याजवळ पुसेसावळी ते कराडकडे जाणाऱ्या रोडलगत सेनविन इंडिया विंड पॉवर सर्विसेस या कंपनीने कामाकरिता ठेवलेले सुमारे २,४२,०००/- रुपये किंमतीचे ४० फूट लांबीचे लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. त्याबाबत कंपनीचे सुपरवायजर सुनील रघुनाथ माने, रा.राजाचे कुर्ले यांनी दि.१३/११/२०२३ रोजी तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध पोलीस ठाणे गु.र.नं. २९४/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

        सदर गुन्हा दाखल झालेनंतर मा.श्री. समीर शेख (पोलीस अधीक्षक सातारा), श्रीमती आंचल दलाल (अप्पर पोलीस अधीक्षक सातारा), श्रीमती अश्विनी शेंडगे (उपविभागीय पोलीस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज) यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत औंध पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री धोंडीराम वाळवेकर यांनी औंध पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध पथकास तपासकामी आवश्यक त्या सूचना देऊन सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. त्यामध्ये पोलिसांना मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार नामे तनवीर अल्ली पटेल, रा.वाघेरी ता.कराड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून तपास केला असता त्याने आणखी ०६ जणांना सोबत घेऊन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामध्ये आजपावेतो पोलिसांनी एकूण ०७ आरोपींना अटक केली असून त्यांचेकडून सदर गुन्हेतील चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

       सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान औंध पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करतेवेळी वापरलेली वाहने- एक टाटा ट्रक व त्याच जोडलेला ट्रेलर, एक महिंद्रा बोलेरो पिकअप, एक दुचाकी मोटरसायकल, गॅस कटर, गॅस सिलेंडर, ऑक्सिजन सिलेंडर, ०७ मोबाईल फोन आणि सेनविन इंडिया विंड पॉवर सर्विसेस कंपनीचे चोरीस गेलेले लोखंडी पोल असा एकूण सुमारे ३०,८९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

        सदर गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे-१) तन्वीर अल्ली पटेल, वय ३१ वर्षे, रा.वाघेरी, ता.कराड २) मुबिन युनुस पटेल, वय २७ वर्षे रा.ओगलेवाडी,ता.कराड  ३) गौरव अंकुश वाघमारे, वय २३ वर्षे,रा. वडोली (निळेश्वर), ता.कराड, जि.सातारा ४) सागर राजाराम वाघमारे,वय ३० वर्षे, रा.वडोली (निळेश्वर)ता.कराड, जि.सातारा ५) सागर दत्तात्रय कुंभार, वय २५ वर्षे रा.वडोली (निळेश्वर)ता.कराड, जि.सातारा ६) सुनील ताराचंद चव्हाण, वय २० वर्षे, रा. सुंदरनगर उत्तरकाले ता.कराड ७) दीपक राजेंद्र सोनवणे, वय २९ वर्षे, सध्या रा.रेल्वे ब्रिजशेजारी, मसूर, ता.कराड, जि.सातारा मूळ रा. जावेद मंदान, ता.शहादा, जि.नंदुरबार.

        सदरची कामगिरी मा. श्री. समीर शेख (पोलीस अधीक्षक सातारा), श्रीमती आंचल दलाल (अप्पर पोलीस अधीक्षक सातारा), श्रीमती अश्विनी शेंडगे (उपविभागीय पोलिस अधिकारी, दहिवडी विभाग कॅम्प वडूज) यांचे मार्गदर्शनाखाली औंध पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे, पोलीस हवालदार राहुल वाघ, रवींद्र बनसोडे, पोकाॅ.महेश जाधव, आरसीपी प्लाटूनकडील अंमलदार यांनी पार पाडली. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार राहुल वाघे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments